पुणे, 1 जानेवारी : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची माहिती देत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'देवेंद्र फडणवीस हे चांगलं केलं तरी टीकाच करणार आहेत. त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करतच असतात,' असा टोला अनिल देशमुख यांनी लगावला आहे.
कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराबाबत पुणे ग्रामीण पोलिसांकडे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र तीन वर्ष झाल्यावर देखील त्यामधे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही. याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारलं असता त्यासाठीचा प्रस्ताव पोलिसांनी सरकारकडे पाठवल्याचे सांगितलं आहे.
'राज्यातील कारागृहांमधे क्षमतेच्या दुप्पट कैदी आहेत. त्यासाठी राज्यात नवीन कारागृह बांधण्याचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर प्रेझेंटेशन सादर करण्यात आलं आहे. यामध्ये पोलिसांच्या घरांचाही प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,' अशी माहितीही देशमुख यांनी दिली आहे.
गृहमंत्र्यांची पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :
- नवीन वर्षाची सुरुवात झाली म्हणून जेलला भेट दिली
- येरवडा जेलच्या काही मागण्या होत्या, त्यांचं निवेदन घेतलं
- कोरोनाचं इथं संक्रमण झालं नाही
- जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त संख्या
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे जेलची क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव दिला आहे
- मॉडर्न जेल आपल्याला करायचे आहे
- याबाबत प्रेझेंटेशन झालं आहे
- पैठणी, बेकरी, कारपेंटरमध्ये अनेक महिला तरबेज झाल्या आहे
- त्याला चांगला प्रतिसाद आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.