Home /News /maharashtra /

पालघर हत्याकाडांवर भाजपने रान उठवल्यानंतर गृहमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले....

पालघर हत्याकाडांवर भाजपने रान उठवल्यानंतर गृहमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले....

पालघरमधील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या करण्यात आली होती.

अकोला, 20 एप्रिल : पालघर येथे दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाकडून हत्या झाल्यानंतर राजकीय वातावरणही तापलं आहे. या मुद्द्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मुदद्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'पालघर येथील घडलेली घटना ही अतिशय दुर्देवी असून या घटनेचे कुणीही राजकारण करू नये, असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अकोल्यात पत्रकार परिषदमध्ये केले. पालघरमधील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखलं होतं. या प्रवाशांची विचारपूस पूर्ण ऐकून घेण्याच्या आतच ग्रामस्थांनी दगडफेक करायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला होता. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. तिघांच्या हत्येप्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी; तर अल्पवयीन 9 जणांची बालसुधारगृहात रवानगी दरोडेखोर असल्याच्या संशयावरून गुरुवारी रात्री गडचिंचले येथे तीन जणांची हत्या केल्या प्रकरणी 110 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी 9 आरोपी 18 वर्षांखलील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले. तर अन्य 101 आरोपींना शनिवार, 18 एप्रिलला डहाणू कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर काही आरोपी फरार असून त्यांचा शोध कासा पोलीस करत आहे. पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह पालघरमधील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या चालकांच्या हत्येनंतर पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याचे पाहायला मिळत असून राज्य राखीव दलाच्या तुकडीसह दीडशे ते दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र पोलिसांसमक्ष साधूंची हत्या झाल्याने पोलिसांच्या भूमिकेसंदर्भात आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या साधूंवर गुरुवारी रात्री जेव्हा हल्ला झाला त्यावेळी तेथील फॉरेस्ट चौकीवरील वनरक्षकाने पोलिसांना या हल्ल्याची माहिती दिली आणि त्या जखमी साधूंना चौकीत बसवून ठेवले होते. पोलिसांना हल्ल्याची कल्पना असताना त्यांनी जमावाला तातडीने पांगविले का नाही असा प्रश्न उपस्थित होत असून जमावाच्या समक्ष त्या साधूंना फॉरेस्ट चौकीतून बाहेर काढल्यानंतर जमावाने वयोवृद्ध साधूवर लाठ्याकाठ्यांसह जबर हल्ला चढवला. त्यावेळी पोलीसांनी कोणताही प्रतिकार न करता बघ्याची भूमिका घेतल्याने तीन जणांची हत्या झाल्याचेच पुढे येत असल्याने पोलीसांच्या एकूण कार्यपद्धतीवरच आता आक्षेप घेतला जात आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Anil deshmukh, Palghar

पुढील बातम्या