शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी धुळीवडीला दिवसभर येथील तरुण दगडे-गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात. एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव केला जातो. यामध्ये अनेक तरुण जखमी होतात. मात्र, हे जखमी लोक दवाखान्यात डॉक्टरकडे न जाता देवीच्या अंगाऱ्यावर नीट होतात. जेवढे जास्त लोक जखमी होतील. त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात. याला श्रद्धा म्हणावी की अंधश्रद्धा हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. घोड्यावरून नाही, गाढवावरून काढली जाते जावयाची मिरवणूक दरम्यान,बीड जिल्ह्यातील विडा गावांत जावयाची मिरवणूक काढली जाते पण ती गाढवावर. कायम रुबाबात आणि ऐटीत मिरवणारे जावई बापू चक्क गाढवावर मिरवणूक निघेल या भीतीने धूम ठोकतात पण विडा गावांतील लोक जावयाचा शोध घेतं त्यांना पकडून आणून गाढवावर बसवतात. ही या गावातील आगळी वेगळी परंपरा आहे. 101वर्षां पूर्वी सुरु झालेल्या या परंपरेला अद्याप खंड पडला नाही. या वर्षीय या शाही मिरवणुकीचे मानकरी जावाई ठरले दत्तात्रय संदीप गायकवाड ते मसाजोगचे रहिवाशी आणि विडा गावांतील बाळासाहेब मोहन पावर यांचे जावई आहेत. केज तालूक्यातील विडा या गावी धुलीवंदनाच्या दिवशी. जावायाला गाढवावरून मिरवण्याची परंपरा आहे. जावाई म्हटले की सासरकडील मंडळींकडून जावयाचा थाट व रुबाब आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहाण्यासाठी मिळाला असेल. पण विड्याचं मात्र आपल्याला जावयाच्या बाबतीत थोड वेगळं चित्र पाहावयास मिळेल. धुलीवंदनाच्या दिवशी जावायाला गाढवावरून मिरवण्याची परंपरा गेल्या 101 वर्षापासून या गावात आहे ही परंपरा आहे. गावातले ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला गावकर्यांनी धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावर बसून त्यांची गावभर मिरवणूक काढली होती, तेव्हा पासून गाढवावर जावयाची मिरवणूक काढली जाते. त्यांत गाढवाच्या गळ्यात खेटराची माळ घालून फिरवले जाते व गावभर जावयाची धिंड काढल्यानंतर त्यांचा गावातील हनुमान मंदिराच्या पारावर मोठ्या मानापानाणे नाराज झालेल्या जावयला कपड्यांचा मनपसंत आहेर व सासर्यांकडून सोन्याची अंगठी दिली जाते. यावर्षी तो मान दत्ता संदीप गायकवाड यांना मिळाला. गावभर डॉल्बी व बँडबाज्याच्या तालावर नाचणारी पोरं आणि त्यांच्या अंगावर गल्लो गल्ली उधळला जाणारा रंग असा रंगारंग हा कार्यक्रम असतो. गाढवावरून गावभर मिरवल्यानंतर शेवटी मारुती च्या पारावर सरपंच व गावकऱ्यांच्या हस्ते कपड्यांचा आहेर व सासर्यांकडून सोन्याची अंगठी असा आहेर चढवन्यात येतो. एकदा नंबर लागल्यानंतर त्याच जावयाला ही संधी मिळत नाही.सोलापुरात खेळली जाते दगड फेकीची होळी pic.twitter.com/9Eedgmpb3l
— News18Lokmat (@News18lokmat) March 10, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Holi, Solapur, Solapur news