Home /News /maharashtra /

हिवरे बाजार ठरला नवा 'आदर्श', सध्या एकच बाधित रुग्ण शिल्लक, आठवडाभरात गाव कोरोनामुक्त

हिवरे बाजार ठरला नवा 'आदर्श', सध्या एकच बाधित रुग्ण शिल्लक, आठवडाभरात गाव कोरोनामुक्त

Hiwre Bazar corona free village सध्या गावातील फक्त एका रुग्णावर उपचार सुरू असून, 15 मे पर्यंत गाव पूर्णपणे कोरोनामुक्त होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    अहमदनगर, 08 मे : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नावलौकिक असलेल्या हिवरे बाजार (Hivrebazar) गावानं कोरोना (coronavirus) काळातही आदर्श घडवला आहे. गावात सध्या कोरोनाचा फक्त एकच रुग्ण (Only one patient) उपचार घेत आहे. तोही 15 मे रोजी घरी परतणार असल्यानं आठवडाभरात गाव कोरोनामुक्त (coronafree village) होणार आहे. एकिकडं अहमदनगर जिल्हा कोरोना रुग्णसंख्येबाबात आघाडीवर असताना हिवरे बाजरनं घेतलेला कोरोनामुक्तीचा वसा कौतुकास्पद आहे. (वाचा-लॉकडाऊनचा नियम मोडून मशिदीत केली गर्दी, पाहा पोलिसांच्या छापेमारीचा Live Video) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात प्रकोप दाखवायला सुरुवात केली त्यावेळी सर्वाधिक हानी झालेल्या जिल्ह्यांमध्ये अहमदनगरचा समावेश होता. अहमदनगरमध्ये अगदी गावागावात मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळत होते. हिवरे बाजार या आदर्श गावातही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जवळपास 50 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. यापैकी 32 जण हे गावात राहणारेच होते. तर उर्वरीत गावाचेच रहिवाशी पण कामानिमित्त बाहेरगावी असणारे असे होते. या रुग्णांपैकी 25 रुग्ण हे हिवरे बाजार प्रशिक्षण केंद्राच्या विलगीकरण कक्षात होते. तर 18 जणांना घरीच विलगीकरणात ठेवलेले होते. पाच रुग्ण अत्यंत गंभीर होते पण त्यांनीही कोरोनावर मात केली. मात्र दोन जणांचा या रोगानं बळी घेतला. पण या रुग्णांपैकी सध्या सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. केवळ एका रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत. हा रुग्ण सध्या नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून तोही 15 मे रोजी घरी परतणार आहे. त्यामुळं 15 मे रोजी हिवरे बाजार गाव कोरोनामुक्त होत आहे. (वाचा-कोरोनातून वाचले पण नव्या रूपात मृत्यूने गाठलं; Mucormycosis मुळे 8 बळी) कोरोनारुपी राक्षसाला पुन्हा गावात प्रवेश करू द्यायचा नाही असा संकल्प सध्या ग्रामस्थांनी घेतल्याचं आदर्शगाव कार्य व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली आहे. त्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. सध्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळं राज्यातील इतर भागांतून आलेले सुमारे 300 शेतमजूर गावात आहेत. त्यांची सर्वांची तपासणी करून शेतातच त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यांची दर आठवड्याला तपासणी केली जाते. लक्षणं आढळल्यास त्यांचं विलगीकरण करून लगेच उपचार केले जातात. ग्रामपंचायतीनं विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यानं त्याचाही फायदा गावकऱ्यांना झाला आहे. मात्र सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत संकल्प करून हे साध्य केलं आहे. भविष्यातही कोरोनाला लांब ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत लढा देण्याचा निर्धार गावकऱ्यांनी घेतला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar News, Coronavirus

    पुढील बातम्या