हितेंद्र ठाकूर यांच्या 'बहुजन विकास आघाडी'समोर 'शिट्टी'मुळं अडचण

हितेंद्र ठाकूर यांच्या 'बहुजन विकास आघाडी'समोर 'शिट्टी'मुळं अडचण

  • Share this:

मुंबई, 02 एप्रिल : 'शिट्टी' या निवडणूक चिन्हाच्या जोरावर गेली अनेक वर्षे वसई विरार भागात सत्ता गाजवणारा 'बहुजन विकास आघाडी' पक्ष अडचणीत आला आहे. बहुजन विकास आघाडीचे वसई-विरार महानगरपालिकेवर गेली अनेक वर्षे वर्चस्व आहे. पण चिन्हामुळे हा पक्ष निवडणुकीपूर्वीच अडचणीत सापडला आहे. 'शिट्टी' हे निवडणूक चिन्ह 'बहुजन महापार्टी'चं अधिकृत चिन्ह असल्याचं गॅझेट प्रसिद्ध झाल्याने हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष आता कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आपला उमेदवार निवडणुकीच्या उतरवणार आहे. पण आपला उमेदवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? याबाबत पक्षामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बहुजन महापार्टी या पक्षाची नोंदणी जानेवारी 2017 ची असून त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. या पक्षाने देशात तब्बल 100 उमेदवार उभे केले असून राज्यात 30 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. येत्या 6 एप्रिलला आणखी काही उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती जनरल सेक्रेटरी शमशुद्दीन खान यांनी दिली आहे. त्यामुळे आता 'बहुजन विकास आघाडी' निवडणूक चिन्हाचा प्रश्न कसा सोडवणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

वाचा अन्य बातम्या

VIDEO: 'तुम्ही मोदींना प्रश्न विचारायला का घाबरता?' राहुल गांधी पत्रकारांवर भडकले

VIDEO व्हायरल : सपना चौधरीच्या गाण्यावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे ठुमके

Throwback 2011 : 28 वर्षांचा दुष्काळ संपतो तेव्हा...

VIDEO: असा आहे काँग्रेसचा जाहीरनामा; राहुल गांधींचं UNCUT भाषण

First published: April 2, 2019, 3:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading