हेही वाचा- Pune : महागाईत खिशाचा विचार करणारं पुण्यातलं ठिकाण! इथं नाश्ताच्या खर्चात मिळतात कपडे, VIDEO
वास्तुकलेचा एक सुंदर नमुना प्रामुख्याने पूर्वी हिंदु आणि ख्रिस्ती लोक या ठिकाणी राहत होते आजही ते राहतात. येथील क्रॉस लोकांसाठी श्रद्धास्थान आहे. म्हातारपाखाडी गावाच्या प्रेवशद्वारापाशी लोपसच घर असून इसवी सन 1800 मधील वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. गजबजलेल्या शहरात एक सुंदर शांत गाव म्हातारपाखाडी हे गाव लपलेले आहे. वास्तुकलेचा एक सुंदर नमुना या गावात गेल्यावर अनुभवयास मिळतो. हार्बर लाईन ने प्रवास केलेल्या अनेकांना याची पुरेशी कल्पना देखील नसेल. टोलेजंग इमारतीच्या दुनियेत हे गाव आतमध्ये दडलेलं आहे. काय म्हणतात स्थानिक रहिवासी रॉयडॉन गोंसलविस गेले अनेकवर्षांपासूनया भागांत राहतात. त्याचं मुळच इथले आहे. रॉयडॉन म्हणाले की, जवळ पास अनेक वर्षांपूर्वी माझगाव बंदर म्हणून विकसित झालं होत. वसई विरार मधील लोक देखिल या काळात इथे स्थायिक झाले होते. इथे उभारलेला क्रॉस देखिल इथंल अजुन एक वैशिष्ट आहे. इथे सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. ज्युलियस सांगतात की, आम्ही बरेच वर्षे झाली इथे राहतो. वेगवेगळ्या धर्माचे लोक इथे राहतात. साध्या उंच टोलेजंग ईमारती उभ्या राहत असताना इथले हेरिटेज टिकवण हे आपल्यापुढे एक आव्हान असणार आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.