EXCLUSIVE VIDEO: एका क्षणात इतिहास जमा झाला ऐतिहासिक अमृतांजन ब्रिज

EXCLUSIVE VIDEO: एका क्षणात इतिहास जमा झाला ऐतिहासिक अमृतांजन ब्रिज

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा-बोरघाटातील मार्ग सुकर करण्यासाठी ऐतिहासिक अमृतांजन ब्रिज 1830 मध्ये उभारण्यात आला होता.

  • Share this:

लोणावळा, 5 एप्रिल: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत पुणे-मुंबई एक्सप्रेल वेवरील ऐतिहासिक अमृतांजन ब्रिज ब्लास्टने उडवण्यात आला आहे. या घटनेचा एक्सक्लुसिव्ह व्हीडिओ News18 lokmat आपल्यासाठी घेऊन आला आहे.

ब्रिटिशकालीन अमृतांजन ब्रिज हटवण्यासाठी जून 2017 मध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान ब्रिज जमिनदोस्त करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार 5 एप्रिल रोजीच हा ब्रिटिशकालीन ब्रिज ब्लास्टने जमिनदोस्त करण्यात आला.

हा आहे अमृतांजन ब्रिजचा इतिहास...

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा-बोरघाटातील मार्ग सुकर करण्यासाठी ऐतिहासिक अमृतांजन ब्रिज 1830 मध्ये उभारण्यात आला होता. ब्रिटिश अधिकारी सर कॅप्टन ह्युजेस यांनी जनरल जॉन मालकोल्म जी.सी.ई. अँनो डोमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ब्रिज उभारण्यात आला होता. मात्र, या मार्गावर ताण वाढू लागला म्हणून 2000 साली पुणे-मुंबई एक्सप्रेस वे उभारण्यात आला. अमृतांजन ब्रिजखालून एक्सप्रेस वेची चार पदरे जात होती आणि हीच बाब वाहतूक कोंडी आणि अपघातास कारणीभूत ठरत होती. त्यामुळे जून 2017 मध्ये ब्रिज हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अखेर आज, 5 एप्रिल रोजी हा ऐतिहासिक ब्रिज इतिहास जमा झाला.

Tags: pune news
First Published: Apr 5, 2020 07:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading