Home /News /maharashtra /

'ही' शाळा बघून तुम्हाला बसेल हादरा, तरीही 90 टक्के लागतो निकाल!

'ही' शाळा बघून तुम्हाला बसेल हादरा, तरीही 90 टक्के लागतो निकाल!

गावापासून दूर शेतामध्ये बांधलेल्या या ताटव्याच्या झोपडीकडे आपल्याला पाहून वाटत असेल यामध्ये नक्की गुर ढोर राहत असतील नाहीतर भंगार सामान तरी यामध्ये ठेवलेला असेल.

    कन्हैया खंडेलवाल, प्रतिनिधी हिंगोली, 14 जानेवारी : एकीकडं भारत अंतराळामध्ये झेप घेत आहे तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही संस्थाचालकांकडून शाळांमध्ये मुलभूत सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीत. शिक्षणाच हे विदारक चित्र समोर आले आहे हिंगोली जिल्ह्यातून. गावापासून दूर शेतामध्ये बांधलेल्या या ताटव्याच्या झोपडीकडे आपल्याला पाहून वाटत असेल यामध्ये नक्की गुर ढोर राहत असतील नाहीतर भंगार सामान तरी यामध्ये ठेवलेला असेल. पण, तुम्ही जो विचार करताय त्यापेक्षा इथले चित्र खूप वेगळं आहे. ही एक शाळा आहे. हे पाहून आपल्याला कदाचित धक्काच बसला असेल पण हे खरं आहे. हिंगोली जिल्ह्यातील सरकळी गाव परिसरात बांधलेली म्हणजे कसं तरी फाटक्या तुटक्या ताटव्यामध्ये भरणारी ही शाळा सत्य गणपती माध्यमिक विद्यालय आहे. शाळा इमारतीच्या नावावर या ठिकाणी फक्त फाटके तुटके ताटवे आहेत. एक माणूस राहणारी झोपडी जरी असली तरी त्या ठिकाणी पिण्याचे पाणी ठेवतो. मात्र, 100 च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत असून ही विशेष करून त्यामध्ये मुलींचाही समावेश आहे आणि या शाळेमध्ये शौचालय नाही, ना पिण्याच्या पाण्याची सुविधा ना शौचालयाची व्यवस्था अशा स्थितीत चालणाऱ्या या शाळेत महापुरुषांचे चित्र सुद्धा ताटव्याच्या भिंतीवर कसं तरी बांधलेले आहेत. शिक्षण घ्यायचे म्हणून ऊन, पाऊस, थंडीचा त्रास शाळेत सहन करणारे हे विद्यार्थी शाळेत येतात कारण, यांना शिक्षण घ्यायचं. सत्य गणपती माध्यमिक विद्यालयमध्ये यावर्षी 105 विद्यार्थी आहेत. कमी पगार मिळूनही या शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांवर मेहनत घेत असल्यामुळे या शाळेचा निकाल 90 टक्केच्या वरी लागतो. सत्य गणपती माध्यमिक विद्यालय हे स्वयं अर्थसहाय्यित असलं तरीही संस्थाचालक शाळेत सुविधा का देत नाहीत हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. प्रत्येक शाळेची तपासणी शिक्षण विभागाकडून तीन वर्षातून एकदा केली जाते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत आहेत की, नाही याची तपासणी केली जाते. त्यानंतर संबंधित शाळेला प्रमाणपत्र दिला जातो. मात्र, मागील पाच ते सहा वर्षांपासून चालू असणाऱ्या सत्य गणपती माध्यमिक विद्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नसूनही हे विद्यालय अद्यापपर्यंत कशाप्रकारे चालत आहेत? शिक्षण विभाग या संस्थाचालकांवर कारवाई का करत नाही? असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही शिक्षणाधिकारी पावसे यांच्याकडे गेलो असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. हिंगोलीच्या पालकमंत्री म्हणून वर्षा गायकवाड यांची नियुक्ती झालेली आहे. वर्षा गायकवाड यांच्याकडे शिक्षण खातं आहे. आता वर्षा गायकवाड या शाळेवर काय कारवाई करणार हे पाहावे लागेल.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या