महाराष्ट्राचा महासंग्राम : वसमतमध्ये अनेक इच्छुक उमेदवार सक्रिय

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेकर आणि काँग्रेसचे जयप्रकाश मुंदडा या दोघांचं वर्चस्व होतं. आता राज्यात भाजपची सत्ता आल्यावर मात्र चित्र बदललं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 04:18 PM IST

महाराष्ट्राचा महासंग्राम : वसमतमध्ये अनेक इच्छुक उमेदवार सक्रिय

हिंगोली, 21 सप्टेंबर : हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेकर आणि काँग्रेसचे जयप्रकाश मुंदडा या दोघांचं वर्चस्व होतं. आता राज्यात भाजपची सत्ता आल्यावर मात्र चित्र बदललं आहे. वसमतमध्ये यावेळी तरी नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का, हा वसमतकरांसाठी उत्सुकतेचा विषय आहे.

वसमत विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. राज्याचे माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे या मतदारसंघाचे शिवसेनेकडून विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत झाली होती. यात शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा यांचा विजय झाला होता.

विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत आता भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.शिवसेना-भाजपची युती झाली तर विधानसभा मतदारसंघांत वसमतची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. इथून शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनाच उमेदवारी मिळू शकते हे सर्व माहीत असतानाही भाजपच्या इच्छुकांनी स्वबळाची तयारी सुरू केलीय.

शरद पवारांचे भावनिक Tweet, म्हणाले.. 'मला आणखी काही नको, महाराष्ट्रासाठी...'

भाजपचे शिवाजीराव जाधव यांनी अनेक दिवसापासून गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान प्रचंड गर्दी जमवून शिवाजीराव जाधव यांनी शक्तिप्रदर्शनही केलं.

Loading...

2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी वसमत मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यास राजू नवघरे आणि जयप्रकाश दांडेगावकर इच्छुक आहेत. भाजपकडून शिवाजीराव जाधव, शिवसेनेकडून जयप्रकाश मुंदडा उत्सुक आहेत.वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव इच्छुकांच्या चर्चेत सध्यातरी दिसत नाही.

2014 विधानसभा वसमत निवडणूक निकाल

जयप्रकाश मुंदडा, शिवसेना - 63 हजार 851

जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस - 58 हजार 295

शिवाजीराव जाधव, भाजप - 51 हजार 197

अब्दुल हाफिज अब्दुल रहमान, काँग्रेस - 13 हजार 996

==========================================================================================

VIDEO: 'वाघासमोर तुकडा फेकलाय', अमोल कोल्हेंची शिवसेनेवर जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 04:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...