मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिक्षकाची बदली झाल्यामुळे पालकाला हृदयविकाराचा झटका

शिक्षकाची बदली झाल्यामुळे पालकाला हृदयविकाराचा झटका

  हिंगोली, 02 जून : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बदली झाल्याचं कळताच गावातील एका पालकाला हृदयविकाराचा झटका आला. ज्ञानदेव आसोले असं या व्यक्तीचं नाव आहे.

  हिंगोली जिल्ह्यातील गढाळा गावातल्या उत्तम वानखेडे गुरुजींची बदली झालीये. दोन दिवसापासून गावात चूल पेटली नाही की कोणी शाळेतून घरी गेले नाही अशी गावची परिस्थिती असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. गढाळा येथील रहिवासी ज्ञानदेव आसोले यांना शिक्षक उत्तम वानखेडे यांच्या बदली झाल्याने जबर धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया नातेवाईक यांनी दिली आहे.

  २ दिवसापासून मागणी करून देखील वानखेडे यांची बदली होत नाही आता आपल्या पाल्यांना कोण सांभाळणार हा विचार मनात घोंघावत असताना ताण आला आणि यांना ज्ञानदेव आसोले यांना हृदयविकाराचा जबर झटका आल्याची माहिती ज्ञानदेव च्या मुलांनी news १८ लोकमत शी बोलताना दिली.

  शिक्षक उत्तम वानखेडे आणि विद्यार्थी,पालक यांचे प्रेम जगाच्या व्यवहारा पलीकडचे आहे. रक्ताचे कोणतेही नाते  नसताना केवळ प्रेमाखातर जुळलेले हे नातं आहे. उत्तम वानखेडे यांची बदली ने ज्ञानदेव आसोले यांना आलेले हृदयविकाराचा झटका ही या प्रेमाची पावती म्हणावं लागेल.

  First published:
  top videos

   Tags: Hingoli