मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हिंगोलीत पोलीस ठाण्यावर जमावाकडून दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

हिंगोलीत पोलीस ठाण्यावर जमावाकडून दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

Stone pelting at Police station: हिंगोलीत संतप्त जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.

हिंगोली, 15 मे: हिंगोली जिल्ह्यात (Hingoli) जमावाने पोलीस स्टेशनवर हल्ला (mob attacked on police station) केल्याची घटना घडली आहे. जमावाने थेट पोलीस स्टेशनवरच दगडफेक केली आहे. हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक केली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे. जमावाने केलेल्या या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोबाइल चोरीच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी मोठा जमाव औंढा पोलीस ठाण्याजवळ जमला. गावातील सय्यद मुजीब यांचा मोबाइल तीन दिवसांपूर्वी चोरीला गेला होता. चोरी करणाऱ्या आरोपींनी सय्यद मुजीब यांना शिवीगाळ केली होती आणि त्यामुळे आज सकाळी मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमत त्यांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली.

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू

मोबाइल चोरी करणाऱ्या आरोपीना अटक करण्याची मागणी जमावाकडून करण्यात आली. यावेळी पोलीस आणि जमावात वाद झाला आणि जमावाने पोलिसांवर दगडफेक (stone pelting on police) केली. संतप्त जमावाने केलेल्या या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 11 आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर जमावाने केलेल्या हल्ल्यात जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published:

Tags: Police