सलग तीन दिवस ड्युटी करुन घरी परतणाऱ्या एसटी चालकाचा मृत्यू

सलग तीन दिवस ड्युटी करुन घरी परतणाऱ्या एसटी चालकाचा मृत्यू

  • Share this:

हिंगोली, 09 जून : राज्यातील एसटी संपाचा आज दुसरा दिवस आहे. पण अजूनही संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र एका एसटी कर्मचाऱ्याचा अतिरिक्त कामामुळे बळी गेलाय. सलग तीन दिवस काम करणाऱ्या एका एसटी चालकाचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडलीये.

मागील दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात एस टी  कर्मचारांचा बंद आहे या मध्ये काही चालक वाहक देखील समाविष्ट झाले आहेत. हिंगोली आगाराचे नियोजन मागील काही दिवसापासून कोलमडले असून चालक आणि वाहकांच्या कर्तव्याच्या वेळाही वारंवार बदलले जात आहेत. त्यामुळे चालक आणि वाहक त्रस्त झाले आहेत.

आगारातील चालक भास्कर अवचार हे मागील तीन दिवसापासून सतत कर्तव्यावर होते. आज दुपारी कर्तव्याची वेळ संपल्यामुळे ते घरी जाण्यासाठी निघाले असता रस्त्यात  हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.या मुळे इतर कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

संघटनेनं प्रशासनावर आरोप केले आहेत की, आगार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना परत कामावर जाण्याचे आदेश दिले होते. मात्र आपली प्रकृती बरी नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं तरीही  आगाराच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्यामुळे कामाचा ताण येऊन अवचार यांच्या छातीत दुखू लागले. त्यांनी हा प्रकार इतर सहकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले जात होते. मात्र, रुग्णालयात पोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकारामुळे आगारात एकच खळबळ उडाली असून वाहन चालक आणि वाहक संतप्त झाले. पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. या घटनेनंतर आगाराची बस सेवाही बंद  झाली आहे.

First published: June 9, 2018, 6:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading