रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महिलेची बसमध्येच झाली प्रसूती

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महिलेची बसमध्येच झाली प्रसूती

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका महिलेची बसमध्येच प्रसूती झाल्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जांभरून येथे घडला.

  • Share this:

हिंगोली, 21 नोव्हेंबर : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका महिलेची बसमध्येच प्रसूती झाल्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात घडला. कविता राजू राठोड असं त्या महिलेचं नाव असून, ती सात महिन्यांची गरोदर होती. तीला सोनोग्राफी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेत असताना बुधवारी ही घटना घडली. नातेवाईकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवल्याने आई आणि बाळावर उपचार करण्यात आले. यापूर्वी सुद्धा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका महिलेची ऑटो रिक्षामध्ये प्रसूती झाली होती.

तांडा येथील कविता राजू राठोड हि महिला ७ महिन्याची गरोदर होती. बुधवारी सकाळी कविताचे नातेवाईक तिला सोनोग्राफीसाठी हिंगोली येथे जिल्हा रुग्णालयात बस ने घेऊन जात होते. पण बसमध्ये प्रवास करत असताना रस्त्यावरील खड्यांमुळे कविताला अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्या. तीच्या नातेवाईकांनी इतर प्रवाशांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला खरा; पण रुग्णवाहिका येईस्तोवर कविताने एका कन्यारत्नाला जन्म दिला होता.

कविताची बसमध्ये प्रसूती झाल्याने नातेवाईक आणि इतर प्रवाशी चिंतेत पडले होते होते. पण अवघ्या काही वेळातच आलेल्या रुग्णवाहिकेतील डॉक्टर इनायतुल्ला खान यांनी बाळ-बाळंतीणीवर उपचार केले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत.

काही दिवसापूर्वी अशीच एक घटना घडली होती. खड्ड्यांमुळे एका महिलेची चक्क ऑटोरिक्षामध्येच प्रसूती झाली होती. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे घडलेली अशा प्रकारची

ही दुसही घटना असून, आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग जागं होईल का? असा सवाल नागरिक वाचिरत आहेत.

 मत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल

First published: November 21, 2018, 5:49 PM IST

ताज्या बातम्या