पोलिसांनी चक्क मोबाईल क्रमांकालाच केले आरोपी; वाचा काय आहे प्रकार

पोलिसांनी चक्क मोबाईल क्रमांकालाच केले आरोपी; वाचा काय आहे प्रकार

पोलिसांनी चक्क मोबाईल क्रमांकालाच आरोपी केले आहे.

  • Share this:

हिंगोली, 30 जानेवारी: एखादा गुन्हा म्हटले की त्यात गुन्हेगार म्हणून एक किंवा अनेक व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता असते. पोलिस देखील अशा गुन्हेगाराचा शोध घेताना तो कुठे राहतो, कसा दिसतो या माहितीवर तपासाची दिशा ठरवतात. पण हिंगोली शहरात एक अजब प्रकार समोर आला आहे. येथील पोलिसांनी चक्क मोबाईल क्रमांकालाच आरोपी केले आहे.

हिंगोली शहरातील मस्तानशहा नगरमध्ये राहणाऱ्या मुलीला एका तरुण वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करुन त्रास देत होता. बरेच दिवस सुरु असलेल्या या त्रासाबद्दल संबंधित मुलीने भावाला सांगितले. मुलीच्या भावाने संबंधित तरुणाला फोन करुन जाब विचारला असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीच्या भावाने थेट पोलिसात तक्रर दाखल केली.

संबंधित त्रास देणाऱ्या तरुणाने 10 वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन फोन केले होते. पोलिसांनी या सर्व क्रमांकावर फोन करुन तरुणाशी बोलण्याचा प्रयत्न पण सर्व क्रमांक बंद होते. अखेर ज्या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती तो सापडत नसल्याने पोलिसांनी चक्क मोबाईल क्रमांकांनाच आरोपी केले.

आता या प्रकरणी पोलिसांनी सायबर सेलकडे मदत मागितली आहे.

बीड : आंबेडकर समर्थकांनी रिपाईच्या कार्यकर्त्याची काढली धिंडं; VIDEO VIRAL

First published: January 30, 2019, 9:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading