VIDEO : व्हायरल झालेल्या 'त्या' पोलिसाच्या फोटोची दुसरी बाजू !

VIDEO : व्हायरल झालेल्या 'त्या' पोलिसाच्या फोटोची दुसरी बाजू !

पण हा फोटो नेमका आहे कुठला याचा शोध न्यूज 18 लोकमतने घेतला. या व्हायरल फोटोची पडताळणी देखील आम्ही केली आणि समोर आले सत्य...

  • Share this:

मुजीब शेख, हिंगोली, 26 जुलै :  पोलिसाच्या पाठीवर बुटाचा  ठसा उमटलेला एक फोटो प्रचंड व्हायरल झालाय. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या जात आहेत वेगवेगळे अंदाज लावले जात आहे. हा फोटो अन्य राज्यातला असल्याचे देखील सांगितलं जातं आहे. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यानचा हा फोटो नसल्याचा दावा सोशियल मीडियावर केला जातोय. राज्यभरात पोलिसांच्या ग्रुपवर देखील याच फोटोची चर्चा आहे.  हाताने शाबासकी दिली असती तर बरं झालं असतं असा मसेज  पसरवला जात आहे. याच फोटोची आम्ही दखल घेऊन पहिले वृत्त दिले होते. पण हा फोटो नेमका आहे कुठला याचा शोध न्यूज 18 लोकमतने घेतला. या व्हायरल फोटोची पडताळणी देखील आम्ही केली आणि समोर आले शंभर टक्के सत्य...

धक्काबुक्कीनंतर चंद्रकांत खैरे भेटले काकासाहेबाच्या कुटुंबियांना!

हा फोटो हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा या गावचा असल्याचं आमच्या तपासणीत सिद्ध झालं. बाळापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या डोंगरकडा इथं कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याचा हा फोटो आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. नांदेड-नागपूर या महामार्गावरील डोंगरकडा येथील आंदोलक रस्त्यावर उतरले होते. सकाळ पासून या मुख्यमार्गावर वेग वेगळे आंदोलन सुरू होते. हजारोंच्या संख्येने असलेल्या आंदोलकांनी नांदेड -नागपूर महामार्ग अडवला होता. बाळापtर ठाण्याचे पोलीस अधीकारी आणि कर्मचारी इथं बंदोबस्तावर होते. यावेळी पाऊस देखील झाला होता. त्यामुळे परिसरात चिखल होता.

रस्त्यावरुन आंदोलकांना हटवतांना पोलीस आणि आंदोलकामध्ये बाचा-बाची, धक्काबुक्की झाली. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक झाली. याच दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पाठीवर आंदोलकाची लाथ पडली. त्यावेळी त्या कर्मचाऱ्याला देखील याची जाणीव झाली नाही.

माझ्या टेबलावर फाईल असती,तर मीच आरक्षण दिलं असतं -पंकजा मुंडे

आंदोलक रस्त्यावरुन हटल्यानंतर सांयकाळी पाचच्या सुमारास पोलीस उपनिरिक्षक तानजी चेरले आणि काही पोलीस कर्मचारी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करीत होते. इथं असलेले सहायक पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांना पोलिसाच्या पाठीवरचा पायाचा ठसा दिसला. आणि त्यानीच हा फोटो काढला. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांच्या एका व्हाॅट्स्अॅप ग्रुपवर त्यांनी हा फोटो शेअर केला. नंतर तो प्रचंड व्हायरल झाला.

दरम्यान, ज्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पाठीवर बुटाचा ठसा उमटला तो पोलीस कर्मचारी आताही डोंगरकडा पोलीस चौकीवर तैनात आहे. त्या आंदोलकांविषयी माझ्या मनात कोणताच द्वेष किंवा राग नाहीये. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही पुन्हा उभे राहु अशी प्रतीक्रिया त्या पोलिसांने न्यूज18 लोकमतला दिली.

सोशल मीडियावर आज काहीही पसरवलं जातं त्याची वेगवेगळी चर्चाही केली जाते. त्या चर्चेच्या आधारावर नको त्या गोष्टी घडतात आणि मुख्य व्यक्तीला याचा त्रास होतो. असाच त्रास या पोलिसांनाही झाला. कायदा हातात घेणाऱ्यांना धडा शिकवणाऱ्या खाकी वर्दीला या अजान शत्रूचा त्रास झाला असेल पण सत्य हे फार काळ लपून राहत नाही. या कर्तृत्वान पोलिसांची खरी बाजू मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला..कोणत्याही परिस्थिती संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्राच्या पोलिसांना आमचा सलाम...

First published: July 26, 2018, 6:44 PM IST

ताज्या बातम्या