हिंगोली लोकसभा निवडणूक : काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये लढत

हिंगोली लोकसभा निवडणूक : काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये लढत

हिंगोली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे सुभाष वानखेडे यांनी निवडणूक लढवली तर शिवसेनेने हेमंत पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं. हिंगोलीची मुख्य लढत या दोघांमध्येच आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी मोदी लाटेतही इथून विजय मिळवला होता.

  • Share this:

हिंगोली, 18 मे : हिंगोली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे सुभाष वानखेडे यांनी निवडणूक लढवली तर शिवसेनेने हेमंत पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं. हिंगोलीची मुख्य लढत या दोघांमध्येच आहे.

वेगवेगळ्या पक्षांचं वर्चस्व

हिंगोलीच्या जागेचा इतिहास पाहिला तर या जागेवर एखाद्या ठराविक पक्षाचा कब्जा कधीच नव्हता. इथे कधी शिवसेनेचा विजय झाला तर कधी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या ताब्यात ही जागा आली.

यावेळी शिवसेनेने हेमंत पाटील यांना तिकीट दिलं तर काँग्रेसने सेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या सुभाष वानखेडेंना रिंगणात उतरवलं. सुभाष वानखेडे हे 2009 मध्ये शिवसेनेचे खासदार झाले आणि नंतर ते काँग्रेसमध्ये आले.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय

देशात मोदी लाट असताना मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर राजीव सातव निवडून आले. त्यांना 4 लाख 67 हजार 397 मतं मिळाली तर शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंना 4 लाख 65 हजार 765 मतं मिळाली. म्हणजे राजीव सातव केवळ 1600 मतांनी जिंकले.

2009 च्या निवडणुकीत सुभाष वानखेडेंचा विजय

2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांना 3 लाख 40 हजार 148 मतं मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीच्या सूर्यकांत पाटील यांचा पराभव केला.

मतदारांचा कौल कुणाला ?

हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड, हिंगोली या विधानसभा मतदारसंघात भाजप, किनवटमध्ये राष्ट्रवादी, हदगाव, वसमतमध्ये शिवसेना, कळमनुरीमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. या सगळ्या मतदारसंघांत मतदारांनी काँग्रेसला कौल दिला की शिवसेनेला हे 23 मे ला कळेल.

हिंगोलीमध्ये 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं. इथे 60.69 टक्के मतदानाची नोंद झाली.

==================================================================================

VIDEO : केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना

First published: May 18, 2019, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading