'सागर जैसी आँखो वाली', जिल्हाधिकारी गिटार वाजवतात तेव्हा...; पाहा VIDEO

'सागर जैसी आँखो वाली', जिल्हाधिकारी गिटार वाजवतात तेव्हा...; पाहा VIDEO

हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी हातात गिटार घेऊन 'सागर'या चित्रपटातील ‘चेहरा है या चाँद खिला है’ हे गाणं सादर केलं. त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Share this:

कन्हैया खंडेलवाल

हिंगोली, 29 फेब्रुवारी : प्रशासकीय अधिकारी म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर नेहमीच कडक शिस्तीचा आणि कठोर स्वभावाचा अधिकारी उभा राहतो. कामाची गरज म्हणून अनेकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांना कठोर भूमिका घ्यावी लागते. कडक स्वभावाच्या या अधिकाऱ्यांमध्येही अनेक कला आणि गुण असतात याची प्रचिती हिंगोली इथं आली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची एक अनोखी अदा हिंगोलीकरांना पाहायला मिळाली. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हिंगोली शहरातील महावीर भवन सभागृहात जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचा समारोप करण्यात आला़.  या समारोप सोहळ्यात यशस्वी खेळाडुंना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले़. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी गिटार वाजवून गाणं सादर केलं.

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी हातात गिटार घेऊन 'सागर'या चित्रपटातील   ‘चेहरा है या चाँद खिला है,जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी ऑंखोवाली, ये तो बता तेरा नाम है क्या,’हे गाणं सादर केलं. याशिवाय इतर काही गाणीही त्यांनी गिटारवर वाजवली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या गायन-वादनाने व्यासपीठावरील अधिकारी आणि उपस्थितही मंत्रमुग्ध झाले. काही अधिकाऱ्यांनी तर डान्सही केला.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना विरंगुळा म्हणून महसूल विभागाप्रमाणेच जिल्हापरिषदेनं स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यात क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश होता. दोन दिवस चाललेल्या स्पर्धांनंतर तिसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. स्पर्धेत क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी यासह वैयक्तिक स्पर्धांचेही आय़ोजन करण्यात आलं होतं.

वाचा : Zomato च्या डिलिव्हरी बॉयने जिंकलं सगळ्यांचं मन, VIDEO तुफान VIRAL

First published: February 29, 2020, 7:01 PM IST
Tags: hingoli

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading