भयानक !, ट्रकमध्ये कोंबले 54 बैल ; ३० बैलांचा तडफडून मृत्यू

भयानक !, ट्रकमध्ये कोंबले 54 बैल ; ३० बैलांचा तडफडून मृत्यू

ट्रकमध्ये कोंबून मध्यप्रदेश येथून हैदराबादकडे नेल्या जाणाऱ्या ५४ पैकी तब्बल ३0 बैल गुदमरून दगावल्याचा भयानक प्रकार पोलिसांनी केलेल्या तपासणीत उघड झाला आहे.

  • Share this:

कन्हैया खंडेलवाल, हिंगोली

23 आॅगस्ट : एका ट्रकमध्ये कोंबून मध्यप्रदेश येथून हैदराबादकडे नेल्या जाणाऱ्या ५४ पैकी तब्बल ३0 बैल गुदमरून दगावल्याचा भयानक प्रकार पोलिसांनी केलेल्या तपासणीत उघड झाला आहे. ट्रकचालक साथीदारासह पळून गेला असून या प्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात ट्रक मालक रफीक खाँ गुलाम निहाज रा. गिता नगर इंदौर (मध्यप्रदेश) आणि ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला करण्यात आलाय.

अकोल्याकडून येत असलेल्या ट्रकमध्ये गुरे कोंबून आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे चिंचाळा पाटीनजीक हा ट्रक अडवला. त्याची तपासणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी मागच्या बाजूने जाताच ट्रकचा चालक आणि साथीदार पळून गेले. ट्रकची पासिंग ही मध्य प्रदेशची असल्याने तो याच राज्यातील असावा, असा कयास आहे. त्यामुळे पोलिसांनी इतरांच्या मदतीने ट्रक गोपाललाल मंदिर गोशाळेजवळ आणला. तेथे आल्यावर आतमधील गुरे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तर त्यातील अनेक बैल मरून पडल्याचे समोर आले. ट्रकमधूनही प्रचंड दुर्गंधी येत होती. यामध्ये भाकड गुरे नव्हती तर पूर्ण बैल असल्याचे दिसून आले. ट्रकमधील केवळ २४ गुरे जिवंत होती. ३0 मृत्युमुखी पडले होते.२४ पैकी १० बैल गंभीर जखमी आहे. पोलिसांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून जिवंत गुरांवर उपचार सुरू केले आहेत. तर इतरांचे शवविच्छेदन केले जाणार आहे.

याबाबत ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार म्हणाले, यातील ट्रक क्रमांक एमपी -0९-एच-0३९९ ताब्यात घेतलेला आहे. चालक आणि इतर पळून गेले आहेत. मात्र जवळपास १५ लाखांचा ट्रक ताब्यात असल्याने आरोपींपर्यंत पोहोचणे सोपे आहे. लवकरच यातील आरोपी पकडले जातील. लिंबाळा भागात गुरांचे पीएम करण्यात येत आहे. त्यांचे विविध प्रकारचे सॅम्पल काढून तपासणीला पाठवण्यात आले .

याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई ची मागणी नागरिकांनी केली आहे.

या प्रकरणी  ट्रक मालक रफीक खाँ गुलाम निहाज रा. गिता नगर इंदौर (मध्यप्रदेश) आणि ट्रकचालकाने गोवंश वाहतुकीस बंदी असताना ५४ गुरे कत्तलीसाठी कोंबुन नेण्याचा प्रयत्न केला. यात ३० गुरे दगावली. यावरुन गोवंश हत्या प्रतिबंधक यासह विविध कलमाने गुन्हा दाखल झाला आहे. या बाबतची फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पोले यांनी दिली आहे.

First published: August 23, 2017, 11:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading