हिंगणघाट: आरोपीची पत्नी म्हणाली, त्यांनी माझ्या तान्ह्या मुलीचा विचार करायला हवा होता

हिंगणघाट: आरोपीची पत्नी म्हणाली, त्यांनी माझ्या तान्ह्या मुलीचा विचार करायला हवा होता

'ते असं काही करतील, असं वाटलं नव्हतं. त्यांनी असं कृत्य करण्यापूर्वी माझ्या तान्ह्या मुलीचा विचार करायला हवा होता.

  • Share this:

वर्धा,5 फेब्रुवारी: एकतर्फी प्रेमातून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यपिका जळीत प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेत ती प्राध्यापिका 40 टक्के होरपळली असून तिच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पीडितेची श्वसनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत आहे. तिच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या चेहरा आणि डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेला आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून पुढील 48 तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होत आहे. कृत्रिम नलिका टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरू केला आहे. पण, अजून धोका टळलेला नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

ते असं करती वाटतं नव्हतं- आरोपीची पत्नी

प्राध्यापिका जळीत प्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीची पत्नी म्हणाली, 'ते असं काही करतील, असं वाटलं नव्हतं. त्यांनी असं कृत्य करण्यापूर्वी माझ्या तान्ह्या मुलीचा विचार करायला हवा होता. घटना घडली त्या दिवसाच्या आदल्या रात्री ते प्रचंड अस्वस्थ होते. ते सारखे घराबाहेर जात होते. फोनवर कोणाशी तरी बोलत होते. सकाळी उठून ते कामाला जातील म्हणून मी त्यांच्यासाठी डबा करून दिला. मात्र, ते काहीही न सांगता घराबाहेर पडले आणि काही वेळातच या घटनेची माहिती मिळाली. मात्र, त्यांनी असं कृत्य करण्यापूर्वी माझ्या तान्ह्या मुलीचा विचार करायला हवा होता.'

पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे

पीडित प्राध्यापिकेसाठी पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे असून तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशा पेशंटला इन्फेक्शन हे अतिशय लवकर होतं. त्यामुळे अतिशय काळजी घ्यावी लागते. दरम्यान काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पीडित प्राध्यापिकेच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे जाहीर केले आहे.

पीडितेच्या गावातही स्मशान शांतता..

राज्याला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीत प्रकरणी मंगळवारी शहरात तीव्र पडसाद उमटले. नराधमाला जिवंत जाळा, त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली जात आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी उत्स्फूर्तपने कडकडीत बंद पाळत मोर्चा काढला. यावेळी संतप्त नागरिकांनी ठाण्यात घेरावही घातला. तर पीडितेच्या गावातही स्मशान शांतता आहे. एकंदरीत नागरिकांत संताप असला तरी शांततेत बंद पाळण्यात आला आहे.

काय म्हणाले गृहमंत्री...

हिंगणघाट येथे काल घडलेली घटना अतिशय निंदनीय असून संबंधित आरोपीला काल अटक करण्यात आली आहे. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आरोपीला कठोरात कठोर शासन होईल यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविले जाईल. पीडित तरुणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तरुणीच्या वैद्यकीय उपचाराबाबत निर्देश देण्यात आले असून उपचाराची संपूर्ण जबाबदारी राज्य शासन घेईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

काय आहे घटना?

एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चेहऱ्यावर पेट्रोल ओतल्यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये तिचा चेहरा संपूर्ण जळाला असून, वाचाही गेली आणि दृष्टीदेखील गेली असल्याची खळबळजनक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी विकेश नगराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्य काय ते अजून बाहेर यायचे आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली हिंगणघाटात दाखल झाले असून या प्रकाराने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

आरोपी विकेश नगराळे याला हिंगणघाटच्या कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला रात्रभर समुद्रपूर पोलिस ठाण्यात ठेवले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतला होता.

हिंगणघाट घटनाक्रम...

# सोमवारी सकाळी ७.१५ वाजता हिंगणघाटच्या नंदोरी चौकात तरुणीवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

# सकाळी ७.३० वाजता जिल्हा उपरुग्णालयात उपचारार्थ दाखल

# सकाळी ७.४५ वाजता काही पोलिस उपरुग्णालयात व नंदोरी चौकातील घटनास्थळी दाखल

# सकाळी ८.१५ वाजता तरुणीला उपचारार्थ नागपूर येथे हलविले

# शहरात घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली

# अकरा वाजता काँग्रेसच्या युवकांचा शहरातून मोर्चा

# शाळा - महाविद्यालयाचे विध्यार्थी एकापाठोपाठ रस्त्यावर

# बारा वाजता युवकांचा पोलिस ठाण्याला घेराव

# महिला व विध्यार्थिनी पोलिस ठाण्यावर मोर्चा

# दुपारी ३ वाजता आरोपीला टाकळघाट येथे अटक

# बुट्टीबोरी पोलिसांनी आरोपीला केले हिंगणघाट पोलिसांच्या स्वाधीन

# पाच वाजता सर्वपक्षीय मोर्चा काढून निषेध

# मंगळवारी सकाळी ७ वाजतापासून शहरात बंदला सुरुवात

# शहरात व्यावसायिकांचा उत्स्फूर्त बंद

# काँग्रेसच्या युवकांचा मोर्चाला सुरुवात

# अकरा वाजता सर्वपक्षीय मोर्चाला नंदोरी चौकातून सुरुवात

# बारा वाजता महिलांचा पोलिस स्टेशनला घेराव

# काही मोर्चेकरांची उपविभागीय कार्यालयावर धडक

# मोर्चात महिला, विद्यार्थीनी व सर्वपक्षीय लोकांचा सहभाग

First published: February 4, 2020, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading