नागपूर, 10 फेब्रुवारी : माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज सकाळी 7.40 मिनिटांनी हिंगणघाट पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली. डॉक्टरांकडून तिला वाचविण्यासाठी पूरेपूर प्रयत्न केले जात होते. मात्र आज सकाळी तिच्या ह्रदयाचे ठोके कमी झाले होते त्यातच तिचा दुर्देवी मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून पीडित तरुणी व्हेंटिलेटरवर होती. हळूहळू तिच्या शरीरातील अवयव निकामी होत गेले. ह्रदय, यकृत, मूत्रपिंड सर्वच अवयव निकामी झाल्याने पीडितेचा मृत्यू ओढवला. दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलखीची असल्याने या पीडितेच्या उपचाराचा खर्च सरकारने घेतला होता. पीडितेसाठी रुग्णालयात स्पेशल कक्ष तयार करण्यात आला होता व त्या ठिकाणी दोन डॉक्टर व 7 नर्सेसची 24 तास नेमणूक करण्यात आली होती. पीडितेला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र तिची झुंज अपयशी ठरली.
#Nagpur: The 24-year-old woman lecturer who was set ablaze near Hinganghat in #Wardha district on 3rd February has succumbed to her injuries today.
— ANI (@ANI) February 10, 2020
मेडिकल बुलेटिन @7.40AM
दोन दिवसांपासून पीडित महिलेला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तिला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. मात्र रात्रीपासून तिच्या ह्रदयाचे ठोके कमी झाले होते. याशिवाय शरीरातील एक एक अवयव निकामी होत चालला होता. ह्रदय, यकृत, मूत्रपिंड सर्वच अवयव निकामी झाल्याने आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, Hinganghat, Hinganghat s13a046