मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हिंगणघाट जळीत हत्याकांड, काय घडलं होतं त्या दिवशी?

हिंगणघाट जळीत हत्याकांड, काय घडलं होतं त्या दिवशी?

पीडितेच्या मृत्यूनंतर दोषीला शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे

पीडितेच्या मृत्यूनंतर दोषीला शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे

पीडितेच्या मृत्यूनंतर दोषीला शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नागपूर, 10 फेब्रुवारी : हिंगणघाटमधील तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गेल्या सात दिवसांपासून ही तरुणी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. आज उपचारादरम्यान सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. एकतर्फी प्रेमातून या तरुणीला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. प्राध्यापक असलेली ही तरुणी खेड्यावरून हिंगणघाटला जाणं-येणं करत असे. सकाळी ती डबा घेऊन निघाली होती. हिंगणघाटमधल्या त्या चौकात जेव्हा ती आली त्यावेळी आरोपी विकेश नगराळे हा दडून बसला होता. त्याच्या एका हातात टेंभा होता आणि दुसऱ्या हातात पेट्रोलची बाटली. तिला पाहताच त्याने एका हाताने तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि दुसऱ्या हाताने टेंभ्याने आग लावली. यानंतर ती जळत होती. मात्र पीडित शिक्षिका जळत असताना काही लोकांना पाझरं फुटलं आणि लोकांनी आग विझवली. तोपर्यंत शिक्षिका 40 टक्के भाजली होती.. यानंतर मात्र तरुणी जमिनीवर कोसळली. आणि सुन्न पडून होती. तातडीने काहीजणांनी तिला रुग्णालयात दाखल केले व उपचार सुरू केले. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. याआधाही आरोपी विकेशने तिला त्रास दिला होता. त्यावेळी पीडित तरुणीच्या पालकांनी त्याला समज दिली होती. पीडितेला पुढील उपचारासाठी नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होतं. येथे तिच्यावर उपचार सुरू होते. तिचा चेहरा आणि पूर्ण डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेला होता. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होत होता.

3 फेब्रुवारीला हिंगणघाटमधील त्या चौकात काय घटलं होतं पाहुयात घटनाक्रम

'हिंगणघाट'चा घटनाक्रम

सकाळी ७.१५ वाजता हिंगणघाटच्या नंदोरी चौकात तरुणीवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

सकाळी ७.३० वाजता जिल्हा उपरुग्णालयात उपचारार्थ दाखल

सकाळी ७.४५ वाजता काही पोलीस उपरुग्णालयात व नंदोरी चौकातील घटनास्थळी दाखल

सकाळी ८.१५ वाजता तरुणीला उपचारार्थ नागपूर येथे हलविले

शहरात घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली

अकरा वाजता काँग्रेसच्या युवकांचा शहरातून मोर्चा

शाळा - महाविद्यालयाचे विद्यार्थी एकापाठोपाठ रस्त्यावर

बारा वाजता युवकांचा पोलीस ठाण्याला घेराव

महिला व विद्यार्थिनींचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

दुपारी ३ वाजता आरोपीला टाकळघाट येथे अटक

बुट्टीबोरी पोलिसांनी आरोपीला केले हिंगणघाट पोलिसांच्या स्वाधीन

सायं 5 वाजता सर्वपक्षीय मोर्चा काढून निषेध

घटनेचे पडसाद

सकाळी ७ वाजतापासून शहरात बंदला सुरुवात

शहरात व्यावसायिकांचा उत्स्फूर्त बंद

काँग्रेसच्या युवकांचा मोर्चाला सुरुवात

अकरा वाजता सर्वपक्षीय मोर्चाला नंदोरी चौकातून सुरुवात

बारा वाजता महिलांचा पोलीस स्टेशनला घेराव

काही मोर्चेकरांची उपविभागीय कार्यालयावर धडक

मोर्चात महिला, विद्यार्थिनी व सर्वपक्षीय लोकांचा सहभाग

हिंगणघाटमधील तरुणीच्या आरोग्य बुलेटिनमधून आलेल्या बाबी

पीडित तरुणीच्या स्कीनच्या पाचही लेन्स जळाल्या होत्या. शिवाय तिच्या दोन्ही डोळ्यांना सुज आली होती. ती बघू शकत नव्हती आणि ती तोंड पूर्णपणे उघडू शकतही नव्हती.

First published: