भाजपमधील बंड थांबवण्यात वरिष्ठांना अपयश, हिना गावितांच्या विरोधात हायकोर्टात याचिका

भाजपमधील बंड थांबवण्यात वरिष्ठांना अपयश, हिना गावितांच्या विरोधात हायकोर्टात याचिका

भाजपमधील बंड थांबवण्यात वरिष्ठांना अपयश येत असल्याच चित्र सोमवारी नंदुरबारमध्ये दिसून आले. भाजपचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते डॉ.सुहास नटावदकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • Share this:

नंदुरबार, 15 एप्रिल- भाजपमधील बंड थांबवण्यात वरिष्ठांना अपयश येत असल्याच चित्र सोमवारी नंदुरबारमध्ये दिसून आले. भाजपचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते डॉ.सुहास नटावदकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु डॉ. नटावदकर यांना भाजपचा एबी फॉर्म मिळाला नाही. कार्यकर्ते आणि निष्ठावंताच्या आग्रहावरुन आपण आपली उमेदवारी माघे घेणार नसल्याचे डॉ. नटावदकर यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन भाजप उमेदवार डॉ. हिना गावितांच्या अडचणीत वाढ निर्माण केली आहे. डॉ. नटावदकर यांनी हिना गावितांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॅा. हिना गावित यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार सुहास नटावदकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. दरम्यान नटावदकर यांनी हिना गावित यांच्या नामनिर्देशन पत्रावर हरकती घेतली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी या हरकती फेटाळल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतरांविरोधात अपक्ष उमेदवार सुहास नटावदकर यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

डॉ. हिना गावित यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात वापरण्यात आलेला स्टँम्प (मुद्रांक) हा शासन परिपत्रकाप्रमाणे खरेदी केला नसून तो कुठून आला याबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. हिना गावितांनी दाखवेल्या उत्पन्नाच्या स्त्रोत देखील चुकीचे असून त्यांच्यावर अवलंबीत असलेल्या घटकांची उत्पन्न बाबतही संशय या याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे.

संघांशी घनिष्ठ संबंध..

मुळातच अपक्ष उमेदवार सुहास नटावदकर हे भाजपचे जेष्ठ बंडखोर नेते असुन २०१४ आधीच्या दोन लोकसभा निवडणुकामध्ये ते भाजपा उमेदवार होते. संघांशी घनिष्ठ संबंध असलेल्या नटावदकर कुटुंबीयांनाकडे गावित परिवाराने राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केल्यानंतर पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपत निष्ठावंत आणि उपरे अशी दुफळी निर्माण झाली असून यातूनच निष्ठावंताकडून सुहास नटावदकरांच्या उमेदवारीला पाठबळ मिळाल्याचे बोलल्या जात आहे. मागील निवडणुकांमध्ये नाराज नटावदकर यांना दस्तुरखुद्द नितीन गडकरी यांनी पुर्नवसानाच शब्द जाहीर सभेत दिला होता. मात्र त्याचाही विसर पडल्याने नटावदकर नाराज असल्याचे बोलल्या जात होते. त्यातून सुहास नटावदकरांची अपक्ष उमेदवारी भाजपासाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे.

सुहास नटावदकर यांच्या पत्नी सुहासीनी नटावदकर, वकील पी.आर जोशी आणि ज्येष्ठ नेते कुवरसिंग वळवी यांनी पत्रकार परिषद घेवून हायकोर्टातील याचिकेबाबत माहीती दिली आहे. १६ एप्रिल रोजी या याचिकेवर सुनावणी होणार असल्याने आता हायकोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तिरंगी लढत...

नंदुरबारमध्ये एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. परंतु येथे मुख्य लढत ही काँग्रेसतर्फे अ‍ॅड.के.सी.पाडवी, भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत व अपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर यांच्यात होणार आहे. डॉ.सुहास नटावदकर यांचे नंदुरबार जिल्ह्यात शैक्षणिक जाळे आहे. डॉ. नटावदकर यांनी 2004 आणि 2009 मध्ये लोकसभा लढवली होती. परंतु त्यांचा पराभव झाला होता. आता मात्र, भाजपकडून हिना गावित यांना उमेदवारी दिल्याने नटावदकर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.

खास हेलीकॉप्टरने नंदुरबारमध्ये दाखल झाले गिरीश महाजन

देशाला महाराष्ट्र हा सर्वाधिक युतीचे खासदार देणारा प्रदेश असेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबार लोकसभेच्या भाजप उमेदवार डॉ.हिना गावित यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हिना गावितांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे खास हेलीकॉप्टरने नंदुरबारमध्ये दाखल झाले होते.

त्यांच्या सोबत पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते. राज्याजील काही मतदार संघात युतील कमी अधिक नाराजी आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र व्यतिरीक्त महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील वाद मिटवण्यासाठी मि प्रयत्नशील असून सर्वांनाच मोदींना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा असल्याने आम्ही सारे वाद मिटवून एकजुटीने काम करु, असा विश्वास देखील गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

VIDEO : काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, हे पाहून नवनीत राणांना कोसळलं रडू

First published: April 15, 2019, 6:12 PM IST

ताज्या बातम्या