विरार, 28 ऑक्टोबर: मुंबईपासून जवळच असलेल्या ग्लोबल सिटी येथे पोलिसांनी हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. आलिशान फ्लॅटमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक शाखेने 3 पीडित मुलींची सुटका केली असून बंटी-बबलीला अटक केली आहे.
विरार ग्लोबल सिटी इडन रोझ महावीर गाडन ओ विंग, रुम नं.अ / 501 येथे वेश्या दलाल दर्शना बाने व दयानंद बाने हे कमिशन घेवून वेश्यागमनासाठी मुली पुरवतात, अशी गोपनिय माहिती पोलिसांनी मिळाली होती.
हेही वाचा...भयंकर! 'त्या' हत्येचं गूढ उकललं, अनैतिक संबंधातून सूनेनंच केला सासूचा खून
पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, पालघर, कार्यालय-नालासोपारा येथे दोन पंचांना बोलावून घेवून बनावट ग्राहक पाठवून अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे, अमोल बोरकर, महेश यशवंत गोसावी, बी.एम.पवार, श्याम शिंदे किणी, कांटेला, डोईफोडे, जगदाळे, यांनी छापा टाकून दर्शना बाने, दयानंद बाने यांना अटक करून 3 पीडित मुलींची सुटका केली. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
धक्कादायर म्हणजे, ग्लोबल सिटी ही विरारमधील अत्यंत उच्चभ्रू अशी लोकवस्ती असणारा परिसर आहे. मुंबईच्या नजीक असणाऱ्या या भागात अनेक श्रीमंत लोक वास्तव्य करतात.
हेही वाचा...लग्न होईना म्हणून फिल्मी स्टाइल बदला; तरुणानं शेजाऱ्याच्या दुकानावर JCB चढवला
भाड्याच्या घरात सुरू होता गोरखधंदा...
दरम्यान, याच परिसरातील एका इमारतीमध्ये आरोपी महिलेने एक घर भाड्याने घेतलं होतं. याच घरात तिने वेश्या व्यवसाय सुरु केला होता. पोलिसांच्या या छापेमारीमुळे विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हे सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिला आणि पुरुषावर पिटा अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे सेक्स रॅकेट चालविण्यात आणखी कुणा-कुणाचा हात आहे, हे देखील पोलीस तपासून पाहत आहेत. तसेच दोन्ही आरोपींची सध्या कसून चौकशी सुरु आहे.