हॉटेलच्या समोरच सुरू होता वेश्या व्यवसाय, 5 महिलांसह 11 जण रंगेहात पकडलं!

हॉटेलच्या समोरच सुरू होता वेश्या व्यवसाय, 5 महिलांसह 11 जण रंगेहात पकडलं!

वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यास गेलेल्या पोलीस पथकावर आरोपींनी दगडाने हल्ला करत त्यांना जखमी केल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 13 जुलै : वेश्या व्यवसायावर कारवाई करू नये यासाठी काही आरोपींनीच पोलिसांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यास गेलेल्या पोलीस पथकावर आरोपींनी दगडाने हल्ला करत त्यांना जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यामध्ये पोलीस जखमी झाले आहेत. ते वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यासाठी गेले होते.

औरंगाबाद रोडवरील पांढरीपूल इथे हॉटेल जय मल्हारमध्ये शुक्रवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. या मारहाणीत पोलीस कॉस्टेबल सिद्धार्थ घुसळे आणि अक्षयकुमार वडते हे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 5 महिलांसह 11 जणांना अटक केली आहे. तर हॉटेलवरही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पांढरीपूल येथील हॉटेल जय मल्हार येथील पत्र्याच्या शेडमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला आणि कारवाई केली. या कारवाईत 5 महिलांसह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांची आता कसून चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच काही आरोपींनी दगडांनी हल्ला केला. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अटक केलेल्या आरोपींवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अशा प्रकारे वेश्या व्यवसाय सुरू असल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

बेडरुममध्ये पत्नीसोबत होता प्रियकर.. अचानक पतीला आली जाग, नंतर झालं असं

अनैतिक प्रेमसंबंधातून आग्रीपाडा परिसरात 20 वर्षीय तरुणाचा नवव्या मजल्यावरून तोल जाऊन मृत्यू झाला आहे. 7 जुलैच्या रात्री ही घटना घडली आहे. प्रेयसीचा पती घरात झोपला असताना तरुण तिला भेटण्यासाठी तिच्या घरात आला होता. अचानक पतीला जाग आल्याचे पाहूण तरुणाने तिथून पळ काढला. बेडरुमच्या खिडकीतून तो बाहेर निघाला. नवव्या मजल्यावरून आठव्या मजल्यावर येण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार, 'या' भागांत पुढचे 5 दिवस कोरड

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर (नाव बदलले आहे) नायर रोड परिसरात कुटुंबीयांसोबत राहात होता. त्याची विवाहीत प्रेयसीदेखील पतीसोबत त्याच बिल्डिंगमध्ये राहत होती. दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध होते. प्रेयसीचा पती घरात झोपला असताना 7 जुलैच्या रात्री सागर प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. दोघे घरात असताना अचानक तिच्या पतीला जाग आल्याचे लक्षात येताच सागरने नेहमीप्रमाणे नवव्या मजल्यावरील खिडकीतून आठव्या मजल्यावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच प्रयत्नात त्याचा तोल जाऊन खाली पडला. त्याचा जागेवर मृत्यू झाला. सुरक्षारक्षकाने त्याला रक्तबंभाळ अवस्थेत पाहिले. तातडीने त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्याला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.ॉ

शेतकरी म्हणाले हवामान खात्यापेक्षा आमचा भोलानाथच बरा! पाहा SPECIAL REPORT

First published: July 13, 2019, 8:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading