Home /News /maharashtra /

धन्यवाद शरद पवारजी! तुमच्यामुळे प्रेरणा मिळाली - हेमंत सोरेन यांनी दिलं विजयाचं श्रेय

धन्यवाद शरद पवारजी! तुमच्यामुळे प्रेरणा मिळाली - हेमंत सोरेन यांनी दिलं विजयाचं श्रेय

आपल्या झारखंडमधल्या निवडणुकीच्या लढतीला महाराष्ट्रातल्या शरद पवार यांच्या लढ्याने प्रेरणा मिळाली, असं हेमंत सोरेन यांची जाहीरपणे सांगितलं आहे.

  रांची, 24 डिसेंबर : झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपची धूळधाण उडाली आणि झारखंड मुक्ती मोर्चाबरोबर आघाडी असणाऱ्या काँग्रेसची सरशी झाली. झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. आपल्या झारखंडमधल्या निवडणुकीच्या लढतीला महाराष्ट्रातल्या शरद पवार यांच्या लढ्याने प्रेरणा मिळाली, असं हेमंत सोरेन यांची जाहीरपणे सांगितलं आहे. झारखंडचे भावी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या यशाचं प्रेरणास्थान शरद पवार असल्याचं Twitter वरच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. शरद पवार यांनी झामुमोच्या सोरेन यांचं अभिनंदन करणारी पोस्ट लिहिल्यानंतर त्याचं उत्तर देताना सोरेन यांनी लिहिलं आहे की, 'धन्यवाद शरद पवारजी. तुमच्या महाराष्ट्रातला लढा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी होता.' सोरेन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शरद पवार यांना टॅग केलं आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हेमंत सोरेन यांचं ट्विटरवर अभिनंदन केलं होतं. वाचा - NPR काँग्रेसच्या काळातली योजना, NRC प्रकरणाशी संबंध नाही- अमित शहा देशभरातून भाजपच्या भगव्या पाउखुणा कमी करण्याचा नवा पॅटर्न झारखंडच्या निकालानं अधोरेखित झाला, असं सांगत पवार यांनी सोरेन यांचं अभिनंदन केलं. शरद पवारांच्या या Twitter पोस्टला उत्तर देताना हेमंत सोरेन यांनी तुमच्यामुळे प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं आहे. 81 जागा असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपचा दारुण पराभव झाला. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीला 47 जागा मिळाल्यात तर भाजपला 25 जागांवर समाधान मानावं लागलं.

  संबंधित - Jharkhand Election Result हेमंत सोरेन यांच्यासाठी मुख्यमंत्री होणं नव्हतं सोपं...

  मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक 30 जागा घेणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन विराजमान होणार आहेत.स्वतः सोरेन यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली आणि जिंकली. 2013 मध्ये हेमंत सोरेन पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. ------------------------ अन्य बातम्या मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतरही या दोन नेत्यांना करावं लागतंय मंत्रिपदासाठी लॉबिंग अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं, जोडो मारोवर चोख प्रत्युत्तरअडवाणींनी केली होती शिफारस, मोदींनी 20 वर्षांनी पूर्ण केलं CDSचे वचन
  Published by:Arundhati Ranade Joshi
  First published:

  Tags: Hemant soren, Jharkhand Election 2019, Sharad Pawar (Politician)

  पुढील बातम्या