Home /News /maharashtra /

शेतकऱ्यांना मदत द्या, शिवसेनेच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकऱ्यांना मदत द्या, शिवसेनेच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्याकडे ही मागणी करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद, 20 ऑक्टोबर : जिल्ह्यात पावसाने खूप मोठ्या प्रमाणात जमिनीचे नुकसान झाले असल्याने कोल्हापूरच्या धर्तीवर  जिल्ह्याला मदत मिळावी अशी मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्याकडे ही मागणी करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यातील जलसंधारण मंत्री व आमदार डॉ. तानाजी सावंत व खासदार ओमराजे निंबाळकर हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असून त्याचा अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार आहे. धावत्या बेस्ट बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका, बस घुसली दुकानात शेतकऱ्यांना हेक्टरी जिरायती 25 हजार व बागायती 50 हजार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील करण्यात येणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले आहे. विमा कंपनी सोयाबीनचे नुकसान भरपाई देत असताना नियम घालून आडकाठी करत असून त्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर, मराठवाड्यात मोठं नुकसान झाले आहे. काही दिवसांमध्ये आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घाईगडबडीने कोणताही निर्णय घेतला जाणार नाही', असं स्पष्ट केले आहे. फडणवीस यांनी केले शरद पवारांच्या भूमिकेचं स्वागत, म्हणाले... 'अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे सुरू आहेत, आढावा घेऊन पुढील मदत केली जाणार आहे. तुर्तास मृतांच्या नातेवाईकांना प्रातिनिधिक मदत दिली आहे. आतापर्यंत मागील सरकारकडून फक्त घोषणाबाजी करण्यात आली आहे. पण, आम्ही कोणतीही घोषणाबाजी करणार आहे. थेट मदत पुरवणार आहोत, असंही ठाकरे यांनी स्पष्ट केले. 'हे संकट अजून टळलेले नाही. येत्या काही दिवसांत पुन्हा अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. त्यामुळे घाईगडबडीने काही केले जाणार आहे. सर्वांची काळजी घेण्याची गरज आहे', असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या