पुण्यानंतर आता नाशकात हेल्मेट सक्ती, 944 जणांकडून तब्बल 4 लाख 72 हजारांचा दंड वसूल

पुण्यानंतर आता नाशकात हेल्मेट सक्ती, 944 जणांकडून तब्बल 4 लाख 72 हजारांचा दंड वसूल

शहरात आजपासून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती लागू केली आहे. सकाळपासून शहरात 944 हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई केली आहे. 944 जणांकडून तब्बल 4 लाख 72 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

  • Share this:

प्रशांत बाग (प्रतिनिधी)

नाशिक, 13 मे- पुण्यानंतर आता नाशिक शहरात आजपासून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती लागू केली आहे. सकाळपासून शहरात 944 हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई केली आहे. 944 जणांकडून तब्बल 4 लाख 72 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 26 पॉइंटवर हे ड्राईव्ह सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी 13 पोलीस ठाण्यातील 520 अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. 'हेल्मेट वापरा अन्यथा कारवाईला सामोरं जा' असा इशारा नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे.

काही ठिकाणी नागरिकांचा उद्रेक

शहरात पोलिसांनी सुरु केलेल्या हेल्मेट सक्तीला काही ठिकाणी नागरिकांनी प्रचंड विरोध केला आहे. या हेल्मेटसक्तीवरुन पोलिस आणि नागरिकांमध्ये  बाचाबाची झाल्याचेही समोर आले आहे. आमचे लायन्स जप्त करा, गाडी जप्त करा आणि आम्हाला दंड करुन कुठे फाशी द्यायचे तिथे द्या, अशा भाषेत नागरिकांनी उद्रेक व्यक्त केला आहे.

विश्वास नांगरे पाटलांचा आवाहन वजा इशारा...

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यांत नाशिक शहरात 63 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यापैकी 38 जणांनी डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. शहरातील अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच वाहन चालकांना वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईत सुरुवातीला 18 ते 35 या वयोगटातील वाहनचालकांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. कारण, त्यांच्या वाहनाचा वेग प्रचंड असतो. कुटुंबातील ते कर्ते पुरुष असतात. 'हेल्मेट वापरा अन्यथा कारवाईला सामोरं जा', असे आवाहन वजा इशारा विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे. ट्रिपल सिट, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, हेल्मेट परिधान न करणे, या अनुषंगाने कारवाई करण्यात येत असल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

नांगरे पाटील म्हणाले की, हेल्मेट हे अत्यंत महत्त्वाचे आहे.  बहुतांश अपघातांमध्ये व्यक्तीला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात तीन पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यू झाला आहे.

VIDEO: नाशिकमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती, विश्वास नांगरे पाटील स्वत: मैदानात

First published: May 13, 2019, 8:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading