मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुढचे चार दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार, हवामान खात्यानं दिला Alert

पुढचे चार दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार, हवामान खात्यानं दिला Alert

गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्राला झोडपून काढणारा मान्सूनचा पाऊस (Monsoon Rains) पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं (IMD) दिला आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्राला झोडपून काढणारा मान्सूनचा पाऊस (Monsoon Rains) पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं (IMD) दिला आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्राला झोडपून काढणारा मान्सूनचा पाऊस (Monsoon Rains) पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं (IMD) दिला आहे.

मुंबई, 29 जुलै :  गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्राला झोडपून काढणारा मान्सूनचा पाऊस (Monsoon Rains) पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं (IMD) दिला आहे. गुरुवारपासून सोमवारपर्यंतचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून रविवारपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार (Heavy rains) तर काही जिल्ह्यांमध्ये संततधार पावसाचा (Normal rains) इशारा देण्यात आला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अधिक पाऊस

रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः समुद्रकिनारच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आदेश यापूर्वीच प्रशासनानं दिले आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

पुढच्या आठवड्यात उघडीप

सोमवारसाठी मात्र कुठलाही अलर्ट नसल्याचं सध्या सांगण्यात आलं आहे. हवामानाच्या सध्याच्या स्थितीनुसार पुढील आठवड्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता असल्याचं दिसत असलं, तरी परिस्थिती प्रत्येक क्षणी बदलत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या तरी महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज असला तरी अनेकदा अचानक ढगांची दाटी होऊन जोरदार पाऊस कोसळत असल्याचे अनुभव यापूर्वीदेखील आले आहेत. सध्या मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा काही भाग वगळता इतरत्र सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.

हे वाचा -इंधनवाढीचा सामान्यांना फटका! पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत सरकारनं दिलं हे स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांमध्ये निसर्गाचं चक्र बिघडत असून कमी कालावधीत विक्रमी पाऊस पडण्याच्या घटना नोंदवल्या जात आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आणि कोकणातील काही भागात असाच काही तासात विक्रमी पाऊस घडल्याचं गेल्या आठवड्यात दिसलं. त्यापूर्वी भारताचा शेजारी असणाऱ्या चीनमध्येदेखील एका दिवसात पूर्ण वर्षातील एक तृतीयांश पाऊस कोसळला होता. समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि पावसात गरज असेल तरच घराबाहेर पडावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Monsoon, Rain