• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बीडमध्ये उन्हाळ्यात पावसाळा, तुफान पावसाने नद्यांना पूर, जीप गेली वाहून VIDEO

बीडमध्ये उन्हाळ्यात पावसाळा, तुफान पावसाने नद्यांना पूर, जीप गेली वाहून VIDEO

वादळी वादऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शेतपिकांसह आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

  • Share this:
बीड, 09 मे : बीडमध्ये  (Beed) भर उन्हाळ्यात पावसाने (Heavy rains in Beed ) दमदार हजेरी लावून धारूर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. अवकाळी झालेल्या पावसामुळे नदी आणि नाले तुडुंब भरून वाहत आहे. नद्यांना पूर आला होता. बीडच्या धारूर तालुक्यातील अनेक भागात आज दुपारनंतर अवकाळी मुसळधार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील आवरगाव, पांगरी, हसणाबाद, भोगलवाडी, थेटेगव्हाण येथील अनेक नद्यांना पुर आला आहे. तर  नद्या, नाल्या, ओढे हे दुथडी भरून वहात आहेत. धारूर घाटातील तलाव प्रकल्प अर्धा भरला आहे तर वादळी वादऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शेतपिकांसह आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यावेळी अनेकांच्या घरांवरील पत्रे देखील उडाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी संदर्भात अद्याप माहिती समोर आली नाही. दरम्यान, उन्हाच्या कडक पाहऱ्यात झालेल्या जोरदार पावसाने गर्मीपासून होणाऱ्या अंगाच्या लाहीलाहीला थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र भर उन्हाळ्यात झालेल्या पावसामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येत्या 24 तासांत कोकणासह गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस राज्यातआणखी काही दिवस अवकाळी पावसाची (Non seasonal rain) स्थिती कायम राहाणार अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसेच येत्या 24 तासांत कोकणासह गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. तर राज्यात तुरळक ठिकाणी गारपीटही (Hailstorm alert) होण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

लॉकडाऊन मध्ये Dish TV देत आहे धमाकेदार ऑफर; 1 महिन्यापर्यंत मिळेल मोफत सेवा

सध्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तर उत्तर कर्नाटकपासून विदर्भापर्यंत वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. परिणामी राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. ही स्थिती पुढील आणखी पाच दिवस अशीच राहिल असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत मध्य महाराष्ट्र, गोवा, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेनं दिला आहे.
Published by:sachin Salve
First published: