मुसळधार पावसानं कसारा घाटातला जुना रस्ता खचला, फक्त एकेरी वाहतूक सुरू

जवळपास 8 ते 25 फूट खोल या भेगा असून ऐन दरीच्या तोंडावर असलेल्या रिटेनिंग वॉलला जोडून हा रस्ता खचल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 10:08 PM IST

मुसळधार पावसानं कसारा घाटातला जुना रस्ता खचला, फक्त एकेरी वाहतूक सुरू

प्रशांत बाग, नाशिक 2 ऑगस्ट : मुंबईहून नाशिकला जाणारा कसारा घाटातील रस्ता 10 दिवस बंद करण्याचा निर्णय हायवे अथोरिटीनं घेतलाय. जोरदार पावसामुळे मुंबई-नाशिक  मार्गावरील जुन्या कसारा घाटातील रस्ता खचल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. जवळपास 100 मीटर लांब रस्त्यावर खोल भेगा पडल्यानं चिंता व्यक्त होतेय.

पक्षाने मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात, सोडणार नाही!

मुसळधार पावसामुळे कसारा घाट रस्ता खचला असून  मुंबईहुन नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या जुन्या कसारा घाटातील काही भाग खचलाय. जुन्या कसारा घाटातील वाहतूक एकेरी मार्गावर सुरू असून रस्ता खचलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून काम सुरू आहे. दरवर्षी घाटात या ठिकाणी रस्ता खचतो असे सांगण्यात येतंय. जवळपास 8 ते 25 फूट खोल या भेगा असून ऐन दरीच्या तोंडावर असलेल्या रिटेनिंग वॉलला जोडून हा रस्ता खचल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

नाशिकच गंगापुर धरन 85 टक्के भरलं असून दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेला विसर्ग पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून विसर्ग पुन्हा सुरु करण्यात आलेला आहे. चार हजार क्युसेक्स इतक्या प्रमाणात पाणी नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीच्या दिशेने सोडल जातय. पुढील दोन दिवसात नाशिक मध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सिझेरियन करताना महिलेच्या पोटात राहिला कापसाचा गोळा, तीनच दिवसात मृत्यू

Loading...

जिल्ह्यातील भावली,आळंदी आणि वालदेवी हे तीन धरणे 100 टक्के भरली आहेत. सलग पाचव्या दिवशी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर,दारणा,नांदूरमध्यमेश्वर,भावली,पालखेड आणि आळंदी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 10:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...