सध्या बंगालच्या उपसागर आणि परिसरार चक्राकार वारे सक्रिय आहेत. तमिळनाडू किनाऱ्यापासून केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टी ही सक्रिय आहे. त्यामळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पडेल. हेही वाचा- IPL 2021: रोहित शर्माची अचूक चाल, T20 World Cup पूर्वी टीम इंडियाला Good News कसा असेल पाऊस? मुंबई-ठाण्यासह कोकण विभागात अनेक ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह पश्चिाम-मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी आणि विदर्भातही काही भागांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस होत आहे. कोकणातील पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण विभागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागांत काही ठिकाणी 5 ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही या काळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत काही ठिकाणी उद्या म्हणजेच गुरुवारी अतिवृष्टी होण्याचा इशाराही दिला आहे. हेही वाचा- राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, म्हणाले... उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतही 8 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसाचा जोर कायम असेल. पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर घाट माथ्यावर पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हेही वाचा- IPL 2021 Playoff: मुंबई इंडियन्सच्या आशा वाढल्या, 'या' पद्धतीनं मिळेल टॉप 4 मध्ये प्रवेश दरम्यान आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच लांबचा प्रवास टाळावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस दक्षिण कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहणार आहे.पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह🌩🌧 जोरदार पावसाची शक्यता. विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा, त्या वेळी घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो.शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपार नंतर संध्याकाळी व रात्री पर्यंत असते. IMD ने दिलेले इशारे पहा pic.twitter.com/IwZkHyzTGR
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 3, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, Rain