जोरदार पाऊस; पुराच्या पाण्यात भाऊ – बहीण गेले वाहून

जोरदार पाऊस; पुराच्या पाण्यात भाऊ – बहीण गेले वाहून

Washimमध्ये जोरदार पाऊस पडत असून नदी नाल्यांना पूर आला आहे.

  • Share this:

वाशिम, 02 जुलै : मुंबईसह राज्यभरात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईचं जनजीवन देखील ठप्प झालं. तर उर्वरित राज्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. वाशिमला देखील पावसानं झोडपून काढलं असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर-आसेगाव रोडवरील वाघी बुद्रूक गावाजवळ असलेल्या नाल्यावर काही मुलं खेळत होती. यावेळी जोरदार पावसामुळे नाल्याला अचानक पूर आला. या पुरात दोन मुलं वाहून गेली असून त्यांचा आता शोध घेतला जात आहे.

बाळू पवार वय ( 14 वर्षे ) आणि पारस बाळू पवार ( 7 वर्षे ) अशी दोन मुलांची नावं आहेत. पुजा आठवीमध्ये कर पारस दुसरीमध्ये शिकत आहे. या घटनेनं गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

रिक्षावाल्यावर 200 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप; GST अधिकाऱ्यांचा छापा

राज्यात जोरदार

राज्यात देखील जोरदार पाऊस पडत असून मुंबईला जोरदार पावसाचा असलेला धोका अद्याप देखील टळलेला नाही. पुढच्या 48 तासामध्ये मुंबईसह अनेक उपनगरांत त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे जीवितहानी वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे समुद्रावर किंवा कोणत्याही टेकड्यांवर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

कोकणात शेतीच्या कामांना वेग

कोकणात देखील पावसानं जोरदार बॅटींग केली असून शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे.

VIDEO : कार चालकांनो पाहा 'हा' व्हिडीओ, सावध राहा तुमचाही जाऊ शकतो जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rainwashim
First Published: Jul 2, 2019 08:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading