प्रमोद पाटील, रायगड, 7 सप्टेंबर : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह असताना आज अचानक ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे गणेश भक्तांची मोठी तारांबळ उडाली. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात पावसाचा अक्षरश: हाहाकार उडालेला बघायला मिळाला. रावे, गडब, पेण शहर या ठिकाणचे रस्ते आणि बाजारपेठा पाण्याखाली गेल्या. अनेक ठिकाणी दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
मुसळधार पावसामुळे पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या पाणीखाली गेल्या. तसेच पावसामुळे संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडीत झाला. पावसामुळे संपूर्ण शहरात काळोख पसरला आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे पेण बस स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचलं. पेणमधल्या पावसाची भयानक दृश्य समोर आली आहेत.
रायगड जिल्ह्याच्या पेण शहरातील मुसधार पावसाची दृश्ये #RaigadRain #Rain #pen pic.twitter.com/ka6FXmZwlo
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2022
खरंतर पेणमध्ये आज सकाळी ऊन पडलं होतं. दुपारीदेखील कडाक्याचं ऊन बघायला मिळालं होतं. पण दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वारे वाहू लागले. त्यानंतर विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. हा पाऊस अतिशय आक्राळविक्राळ रुप घेवून आला. मुसळधार पावसामुळे शहरातील बाजारपेठेत पाणी भरलं. अनेक वाहनं पाण्याखाली गेली. नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अतिशय भयानक असा हा पाऊस होता.
पेणमध्ये पावसाचा हाहाकार, आक्राळविक्राळ पाऊस, रस्ते पाण्याखाली, बाजारपेठेत पाणी #penrain #raigad #rain pic.twitter.com/bs7k6n3jFd
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2022
विशेष म्हणजे पेण शहरात सकाळपासून वीज पुरवठा सुरळीत सुरु नव्हता. दिवसभर विजेचा लपंडाव सुरु होता. पण मुसळधार पावसाने या विजेला जाण्यासाठी जणू काही कारण मिळालं आणि तेव्हापासून विजेचा पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे नागरीक दुहेरी संकटात सापडले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.