Home /News /maharashtra /

दौरा Vs दौरा, मुख्यमंत्री ठाकरे सोलापुरात तर फडणवीस बारामतीत पोहोचणार!

दौरा Vs दौरा, मुख्यमंत्री ठाकरे सोलापुरात तर फडणवीस बारामतीत पोहोचणार!

शेतकऱ्यांच्या बांधावर जावून धीर देण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यावर निघाले आहे. तर दुसरीकडे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बारामतीपासून दौऱ्याला सुरूवात करणार आहे.

    मुंबई, 19 ऑक्टोबर : कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले घास हिरावून घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून धीर देण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यावर निघाले आहे. तर दुसरीकडे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बारामतीपासून दौऱ्याला सुरूवात करणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार 19 रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. सोलापूर जिल्ह्याला अतिमुसळधार पावासाचा खूप मोठा फटका बसला आहे. सांगवी, अक्कलकोट, बोरी नदी, रामपूर, बोरी उमरगे या पूरग्रस्त भागांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसभर पाहणी करणार आहेत. पूरग्रस्त भागातील मदतकार्य तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ आवश्यक ते पंचनामे कागदपत्रांच्या फारशी शहानिशा न करता पुर्ण करण्याचे आदेश आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहे. आज सोलापूर जिल्ह्याचा पूरग्रस्त भागांचा दौरा पुर्ण केल्यावर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरग्रस्त  भागाचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीतून बाहेर निघत नाही, असे आरोप विरोधकांनी केले आहे. एवढंच नाहीतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी राज्यात फिरावे असा सल्ला दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा आज हा दुसरा दौरा आहे. असा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दौरा सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय  विश्रामगृहाकडे प्रयाण सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून कारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे) , सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण, सकाळी 11:30 वा.    अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी 11:45वा.    अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण, दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण, दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी, दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण, दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी  व नंतर  सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण तर दुसरीकडे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजपासून तीन दिवसांच्या अतिवृष्टी झालेल्या भागांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते पुणे आणि सोलापूरचा दौरा करतील. विशेष म्हणजे,  बारामतीपासून सुरुवात करुन कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परांडा या ठिकाणी पाहणी करुन उस्मानाबादकडे रवाना होतील. आज त्यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही सोबत असतील. फडणवीस यांचा असा आहे आजचा दौरा 10.00 - बारामती विमानतळ इथे आगमन कुरकुंभ, दौंडकडे प्रयाण मळदगांव-रावणगाव-खडकी-स्वामीचिंचोली 11.45 - इंदापूरकडे प्रयाण संसर-निमगाव केतकी-इंदापूर 2.00 - माढा, सोलापूरकडे प्रयाण टाकळी-गारअकोले, तालुका माढा, कंदर-तालुका करमाळा, शेलगाव वांगी, तालुका करमाळा 4.30 - परांडा, उस्मानाबादकडे प्रयाण 5.30 - रोसा, जामगाव, तालुका परांडा 7.30 - उस्मानाबादमध्ये आगमन आणि मुक्काम

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या