Home /News /maharashtra /

BREAKING: मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली; वाहनांच्या लांबच लांब रांगा

BREAKING: मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Landslide on Mumbai-Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली.

रत्नागिरी, 11 जुलै : कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना आता परशुराम घाटात दरड कोसळली (Landslide at Parshuram Ghat) आहे. ही दरड कोसळल्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने दरड कोसळण्याचा धोका अधिक वाढला आहे. परशुराम घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. परशुराम घाटात गेल्या दोन तासांत दोन ठिकाणी दरड कोसळली आहे. यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि रात्री अशा प्रकारे दरड कोसळल्यास मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कालपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. महामार्गावर दरड कोसळण्याची या महिन्यातली दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात भोस्ते घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती. पुढील हवामानाचा अंदाज 12 जुलै - कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 13 जुलै - कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ratnagiri

पुढील बातम्या