मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जळगावात पावसाचं थैमान आणि त्यात नदीला पूल नाही; उपचारापूर्वीच बालिकेचा बोटीत तडफडून अंत

जळगावात पावसाचं थैमान आणि त्यात नदीला पूल नाही; उपचारापूर्वीच बालिकेचा बोटीत तडफडून अंत

Jalgaon girl died because of no treatment: कोकण, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं थैमान सुरू आहे. मुसळधार पावसात उपचाराअभावी 13 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

अमळनेर, 7 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. मुसळधार पावसात बोरी नदीला पूर (Flood) आलेला आणि त्यात येण्याजाण्यास नदीवर पूल नाहीये. 13 वर्षांची मुलगी तापाने फणफणत होती मात्र, नदीवर पूल नसल्याने पुराच्या पाण्यातून उपचारासाठी नेता आले नाही. तसेच गावात डॉक्टर नाही अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारसाठी नेण्यासाठी नदी काठावर आणले. काही तरी प्रयत्न करू...पण दुर्दैव...! तिथेच नदीकाठी त्या निष्पाप बालिकेचा मृत्यू झाला (13 year old girl died due to no treatment). आदिवासी आरुषीचा करूण अंत झाल्याने गाव हळहळला.

अमळनेर तालुक्यातील सात्री येथे आरुषी सुरेश भिल ही 13 वर्षांची मुलगी तापाने आजारी होती. मात्र बोरी नदीला पूर आलेला आणि वर्षानुवर्षे हे गाव पूल नसल्याने जीव धोक्यात घालून नदी ओलांडत असत. मात्र पूर जास्त असल्याने मुलीला दवाखाण्यात नेता आले नाही तर डॉक्टरला गावात येता येत नाही. सकाळी मुलीचा ताप वाढला अस्वस्थ झाल्याने कसे तरी तिला खाटेवर टाकून नदी ओलांडू म्हणून नदी काठावर आले. मात्र आरुषीचे दुर्दैव आड आले. तिचा झटका येऊन तेथेच मृत्यू झाला.

VIDEO: रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, दापोलीत ढगफुटीसदृश्य पाऊस

आई वडिलांनी आकांड तांडव केला. पण तरी लाडकी लेक वाचावी म्हणून चार पाच लोकांनी मोटरसायकलचे ट्यूब टाकून स्वतःच जीव धोक्यात टाकून बोरी नदी पार केली. मात्र तिला दवाखाण्यात डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले.

सात्री गाव निम्न तापी प्रकल्पात पुनर्वसित गाव आहे. आठ वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे गावातून बाहेर निघायला जागा नाही. दोनच दिवसांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी नव्या पुनर्वसित गावठाणाला भेट देऊन गेले, त्यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी गावात व्हायरल तापाचे रुग्ण आहेत दवाखाण्यात कसे नेऊ? आम्ही जगावे की मरावे? असा संतप्त सवाल केला होता. मात्र निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही गावात डॉक्टर पाठवले नाही किंवा गावात जायला आपत्ती व्यवस्थापनाची बोट देखील पाठवली नाही.

आज एका मुलीचा अंत झाला आहे. आणखी किती बळी प्रशासन घेणार? दोन दिवसांपूर्वी आदिवासी बांधवांना घरपोच देण्यात येणारी खावटी देखील त्यांना नदीतून जाऊन डांगरी येथून आणावी लागली होती. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना तब्बल 75 वर्षांपासून पूल नाही आणि गावात जायला रस्ता नाही यापेक्षा विदारक चित्र काय असेल.

First published: