कोल्हापूर, सांगलीमध्ये पुन्हा सतर्कतेचा इशारा, 'या' तारखांना होणार मुसळधार पाऊस

कोल्हापूर, सांगलीमध्ये पुन्हा सतर्कतेचा इशारा, 'या' तारखांना होणार मुसळधार पाऊस

गेल्या 8 दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं. त्यात सोमवारी मात्र पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. पण आज आणि उद्या पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

पुणे, 13 ऑगस्ट : महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्यात वेधशाळेनं पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातल्या घाट क्षेत्रामध्ये 13 आणि 14 ऑगस्टला मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता कुठे पाणी ओसरून पुरामुळे उद्ध्वस्त झालेला संसार सुरळीत सुरू करायचा आहे. त्यात आता हवामान खात्याच्या अंदाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

गेल्या 8 दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं. त्यात सोमवारी मात्र पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. पण आज आणि उद्या पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नागरिकांची चिंता वाढणार आहे. दरम्यान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडला. तर कोकणातल्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये 13 आणि 14ला तुरळक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये आणखी 3 मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43वर पोहोचली असून अद्यापही 3 जण बेपत्ता आहेत. यंदाच्या या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि आर्थिक नुकसान झालं आहे. पण या सगळ्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण देशभरातून मदतीचा हात पुढे येत आहे.

कोल्हापुरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना चारा छावणीला भेट दिली. ज्या तरुणांनी यावेळी पूरग्रस्तांना मदत केली त्यांचं कौतुक केलं पाहिजे असही ते म्हणालेत. तर माझी कोल्हापुरात येण्याची इच्छा होती. मात्र येऊ शकलो नाही असही ते म्हणालेत. तर मराठी कलाकारांपासून ते सर्वसामान्य लोक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

कोल्हापूर, सांगलीतल्या पूरपरिस्थितीनंतर आता राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर थांबला आहे. त्यामुळे पूर ओसरण्यास मोठी मदत होईल.

इतर बातम्या - SPECIAL REPORT : बोगस बॉलिवूड, मुंबईतून पैसा हवा पण महापुराला मदत नको?

मराठवाड्याला दिलासा...

मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवली असताना ऐन दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरण 87 टक्के भरलं आहे. जायकवाडीतून आज पाणी सोडण्याची शक्यता आहे. यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर अखेर 8 दिवसानंतर मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला आहे. कोल्हापूर इथं महामार्गावरून एकेरी वाहतूक तात्पुरती सुरू करण्यात आली आहे. इंधनांच्या गाड्या आणि गरजेच्या वस्तूंचे ट्रक कोल्हापूरकडे रवाना करण्यात आलेत.

पुराच्या तडाख्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. अनेक घरं कोलमडून पडली असून आतलं सर्व साहित्य भिजून खराब झालं आहे. आता मोडून पडलेला हा संसार पुन्हा उभं करण्याचं आव्हान या लोकांपुढे असणार आहे.  कोल्हापूरला पूर आल्यानंतर सार्वाधीक पूरग्रस्त असलेल्या शिरोळमधे पूर्ण दिवसभर NDRF चे बचावकार्य चालू रहाणार आहे. अद्यापही कृष्णा नदीच्या तीरावरची काही गावं पूराच्या पाण्यानी वेढलेली आहेत. हे पाणी अजून 6 दिवस ओसरण्याची शक्यात कमी आहे अशी माहिती माहिती NDRF ने दिली आहे.

पूर ओसरू लागल्यानंतर आता अनेक समस्यांचा सामना कोल्हापूरवासियांना करावा लागतोय. सर्वात मोठी टंचाई निर्माण झाली आहे ती पेट्रोलची. पेट्रोल भरण्यासाठी शहरातल्या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होतेय. सकाळी सहा वाजल्यापासून कोल्हापूरकर पेट्रोलसाठी रांगेत उभे आहेत. पावसाची रिपरिप सुरू असतानाही शेकडो वाहनं घेऊन कोल्हापूरकर पेट्रोलपंपावर उभे आहेत. शहरातल्या अनेक पंपांवर पेट्रोलसाठी भलीमोठी रांग पाहायला मिळते.

केक कापावा इतक्या सहज पाडली इमारत, पाहा घटनास्थळावरचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2019 08:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading