मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुन्हा कोसळधार! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा

पुन्हा कोसळधार! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाकडून पुन्हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. घराबाहेर पडण्याआधी तुमच्या जिल्हयातील पावसाचा अंदाज कसा असेल जाणून घ्या.

    मुंबई : मुंबईसह उपनगर आणि कोकण-पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. पाऊस काही उसंत घेण्याचं नाव घेत नाही. विदर्भालाही मागच्या तीन दिवसात पावसानं चांगलंच झोडपलं आहे. हवामान विभागाकडून पुन्हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. घराबाहेर पडण्याआधी तुमच्या जिल्हयातील पावसाचा अंदाज कसा असेल जाणून घ्या. मुंबईसह उपनगर आणि कोकणात आज काहीसा दिलासा मिळणार आहे. धो-धो पावसामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आज दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगर आणि कोकणात आज हलक्या स्वरुपाचा पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 19 ऑगस्ट रोजी राज्यात हलक्य ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसला आहे. तर वर्धा जिल्ह्यातही काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. मात्र पूर परिस्थिती नाही, नागरिक सुरक्षित आहेत, रस्तेही सुरळीत असल्याची माहिती आहे. गडचिरोलीला पुराचा फटका बसला आहे. पर्लकोटा नदीनं पात्र सोडल्याने पूल पाण्याखाली गेला आहे. तिथल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: IMD, IMD FORECAST, Weather update

    पुढील बातम्या