मुंबई, 26 मे : राज्यात मागचा काही दिवसांपूर्वी मान्सून पूर्व (pre monsoon rain) पावसाने चांगलीच हजेरी लावली. दरम्यान कालपासून विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) मान्सून पूर्व पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (cyclone) झाला यामध्ये पिकांसह साठवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे. विदर्भात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे. (Vidarbha rain update) हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना yellow alert देण्यात आला आहे. विदर्भात अचानक हवामानात बदल झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होत असतानाच पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान मिळत आहे. अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत असून, उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. 26) विदर्भात मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यता असून, कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हे ही वाचा : Kolhapur Accident CCTV: राधानगरी - भोगावती मार्गावर भीषण अपघात, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद
मागच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 41 अंशाच्या आसपास होता. कोकणात कमाल तापमान 34 ते 36 अंश, मध्य महाराष्ट्रात 27 ते 37 अंश, मराठवाड्यात 36 ते 40 अंश आणि विदर्भात 37 ते 43 अंशांच्या दरम्यान राहिले. दक्षिण ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, बिहारपासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे मान्सून पूर्व पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. 26) विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा alert हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बुधवारी (ता. 25) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :पुणे 35.2, धुळे 41, जळगाव 39.5, कोल्हापूर 34.1, महाबळेश्वर 27.1, नाशिक 34.4, सांगली 35.2, सातारा 34, सोलापूर 37 अंश तापमानाची नोंद झाली.
हे ही वाचा : मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कर्मचाऱ्यांची तारांबळ
विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे दरम्यान जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने yellow alert देण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनसाठी पोषक हवामान
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाऱ्यांची वाटचाल चार-पाच दिवसांपासून मंदावली आहे. मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण होत असून, शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मॉन्सूनची प्रगती शक्य आहे. अरबी समुद्रात मालदीव आणि कोमोरीन भागासह, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathwada, Rain, Vidarbha, Weather forecast