रायगड, 05 सप्टेंबर: राज्यात (Maharashtra Rain Update) आज आणि उद्या पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाकडून असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यातच आज रत्नागिरी (Ratnagiri)आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आलाय. अशातच मुंबई शहर (Mumbai Rain) आणि उपनगरातही (Mumbai Suburb Rain) पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत.
राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर यलो अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
वाह! वाह! महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम
उद्या म्हणजेच 6 सप्टेंबरसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं ही माहिती दिली आहे. 7 सप्टेंबरसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 8 सप्टेंबरसाठी पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं किनारपट्टीवरील मच्छिमारांना सावध राहण्याचा इशारा दिला असून खोल समुद्रात बोटी घेऊन न जाण्याच्या सूचनाही दिल्यात.
अफगाणिस्तानात हिंसाचाराची धग तीव्र; पंजशीरमध्ये 600 तालिबान्यांचा खात्मा; नॉर्दन आघाडीचा दावा
दरम्यान पुणे, नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह पश्चिम-मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी आणि विदर्भातही काही भागांत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.