मुंबईसह उपनगरात 'कोसळधार', साचले पाणी, या जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट'

मुंबईसह उपनगरात शनिवारी सकाळपासून मुरळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली.

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2019 03:39 PM IST

मुंबईसह उपनगरात 'कोसळधार', साचले पाणी, या जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई,7 सप्टेंबर: मुंबईसह उपनगरात शनिवारी सकाळपासून मुरळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली. दुपारी अडीच वाजेनंतर पावसाचा जोर आणखी वाढला आहे. पुढील काही तास असाच पाऊस सुरू राहीला तर उपनगरीय वाहतूक तसेच रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, गोरेगाव परिसरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे.

ठाणे जिल्हयातही पाऊस..

ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाण्यात मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, कोलशेत, ब्रह्मान्ड, घोडबंदर रोड परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. या बरोबरत भाईंदर, वसई, विरार पट्ट्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे.

या जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट'

कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांत हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Loading...

पंचगंगेची पाणीपातळी वाढली

राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस आहे. पंचगंगा नदीच्या पाणीच्या पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापुरात एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आली आहे.

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, मोदींचा नागपूर दौरा रद्द

दरम्यान, विदर्भात गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागपूरमध्येही जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा (शनिवार) नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. 24 तासांत 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडणार असेल किंवा 2, 3 दिवस जर जास्त पाऊस झाला तर रेड अलर्ट दिला जातो. त्यामुळेच 4 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला. पावसाचे ढग ओडिशा राज्यावर आले आहेत. ते उद्यापर्यंत छत्तीसगडपर्यंत येईल त्यामुळे विदर्भात जोरदार पाऊस पडू शकतो, असे नागपूर हवामान विभागाने म्हटले आहे.

गडचिरोलीमध्ये पूर

गडचिरोलीमध्येही मागच्या दोन दिवसांपासून पुराची स्थिती आहे. दक्षिण गडचिरोलीतील भामरागड आणि मूलचेरा या दोन तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला. पर्लकोटा नदीला पूर आल्याने मोठा पूल पाण्याखाली आला. त्यामुळे भामरागड तालुक्याचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला.

चंद्रयान मोहिमेचं कवी कसं वर्णन करतील, पाहा UNCUT पंतप्रधान मोदींचं भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2019 03:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...