• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • VIDEO: ...अन् पुराच्या पाण्यात 6 जनावरे गेली वाहून

VIDEO: ...अन् पुराच्या पाण्यात 6 जनावरे गेली वाहून

Heavy rainfall in Yavatmal: यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात 6 जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे.

  • Share this:
यवतमाळ, 18 जून: यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस (Heavy Rain in Yavatmal) सुरू आहे. सतत दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नद्या नाल्यांना पूर आला आहे. घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे नाल्याला आलेल्या पुरात 6 ते 7 जनावरे वाहून गेल्याची घटना (6 to 7 animals washed away in flood) समोर आली आहे. सकाळच्या सुमारास गुराखी गावातील गाई, बैल चरण्यासाठी जंगलात घेऊन गेले. दरम्यान दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस आला. त्यामुळे गुराखी जनावरांना घेऊन गावाकडे येत असताना गावालगत असलेल्या नाल्याला मोठा पूर आला होता. या पुराच्या पाण्यात 6 ते 7 जनावरे वाहून गेल्या. या घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली मात्र अजूनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. या घटनेने शेतकरी बेचैन झाले असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. बुलडाण्यात महिलेचा जीव वाचवला बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि चिखली तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. खामगाव तालुक्यात एका नाल्याला आलेल्या पुरातून रस्ता ओलांडणारी महिला पुराच्या पाण्यात वाहू लागली. हे पाहताच घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी धाव घेत या महिलेचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Published by:Sunil Desale
First published: