Home /News /maharashtra /

VIDEO: रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, दापोलीत ढगफुटीसदृश्य पाऊस

VIDEO: रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, दापोलीत ढगफुटीसदृश्य पाऊस

Maharashtra Rain forecast: रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांत पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसल्याचं पहायला मिळालं.

शिवाजी गोरे, प्रतिनिधी रत्नागिरी, 7 सप्टेंबर : सोमवारी सायंकाळपासूनच रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात जोरदार पाऊस (Heavy Rain) बरसण्यास सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत (Dapoli) सोमवारी रात्री अचानक अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले. दापोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शहरातील सखल भागांत, नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचं पहायला मिळालं. दापोली शहरातील केळकर नाका, शिवाजी नगर, नांगर बुडी, भारत नगर, जालगाव परिसरात सखल भागात अनेक लोकांच्या घरामध्ये पुराचे पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील रस्त्यावर 3 ते 4 फुट पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. शहरातील काही लोकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शहरात भीतीचे वातावरण निर्माण होऊन  काही काळ शहरात गोंधळ उडाला होता. रात्री 1 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस बरसत होता. त्यानंतर पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे संपूर्ण शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून शिव आणि वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. अतिवृष्टीच्या इशारामुळे चिपळूणमध्ये नगरपरिषदेकडून रात्रीच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे शहरवासीयांची चिंता वाढू लागलीय. सध्या चिपळूणमधील जुना बाजारपुलाला पाणी टेकले आहे. चिंचनाका, वडनाका, अनंत आईस फॅक्टरी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्यास शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाल्यामुळे व्यापारी वर्गात देखील मोठी चिंता पसरली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Rain, Ratnagiri

पुढील बातम्या