मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: गडचिरोलीत मुसळधार पावसात लहान पूल गेला वाहून; शहराकडे जाणारा मुख्य रस्ता बंद

VIDEO: गडचिरोलीत मुसळधार पावसात लहान पूल गेला वाहून; शहराकडे जाणारा मुख्य रस्ता बंद

Heavy rainfall in Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसात राष्ट्रीय महामार्गावरील एक पूल वाहून गेला आहे.

Heavy rainfall in Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसात राष्ट्रीय महामार्गावरील एक पूल वाहून गेला आहे.

Heavy rainfall in Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसात राष्ट्रीय महामार्गावरील एक पूल वाहून गेला आहे.

गडचिरोली, 8 जुलै : गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli) आज दुपारपर्यंत मुसळधार पावसाने जिल्हयाला (Heavy rain) झोडपून काढले आहे. पावसाच्या पाण्यात राष्ट्रीय महामार्गावरील गोवींदपुर लगतचा एक लहान पूल वाहुन गेला आहे. गडचिरोली शहराला जिल्हयाच्या दक्षिण भागाशी जोडणा-या महामार्गावर गोवींदपुर नाल्यावर तात्पुरता लहान पूल (रपटा) उभारण्यात आला होता. मात्र, पावसात तात्पुरता पूल वाहुन गेला आहे. हा पूल वाहून गेल्याने दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातुन गडचिरोलीकडे येणारी वाहतूक बंद पडली आहे. जिल्ह्याच्या पुर्वोत्तर भागात दमदार पावसाने हजेरी लावली देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले दरम्यान गडचिरोली चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरु असल्याने गोवींदपुर नाल्यावर एक लहान पूल तयार करण्यात आला होता. आज झालेल्या दमदार पावसाने हा पूल पुर्णपणे वाहुन गेल्याने दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातल्या सहा तालुक्यातुन गडचिरोली शहराकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद पडली होती. अखेर या महामार्गावरील वाहतुक कुनघाडा पोटेगाव मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दमदार पावसाने शेतीला फायदा होण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाने नागपुरला झोडपलं; रस्त्यावर गुडघाभर पाणी

गेल्या आठ-दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने नागपूर शहरात आज जोरदार हजेरी लावली. सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. रस्त्यांवर चक्क गुडघाभर पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. तसेच सखल भागांत असलेल्या सोसायटी आणि घरांतही पावसाचे पाणी शिरले.

शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले साचले. रामदास पेठ, धरमपेठ, शंकर नगर, शिवाजी नगरसह अनेक भागातील पाणी साचल्याने दृश्य पाहायला मिळत आहे. रामेश्वरी, पारडी, भरतनगर, कळमना, प्रभाग क्रमांक 1 हुडको कॉलनी भागात अनेक घरात पाणी शिरल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शरले असून स्थानिक नगरसेवकांचे लक्षच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

First published:

Tags: Gadchiroli, Rain