हैदर शेख, प्रतिनिधीचंद्रपूर, 13 जून: संपूर्ण राज्यभरात मान्सून (Monsoon) दाखल झाला आहे. मान्सून दाखल होताच राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस (Heavy rain) पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. अशाच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसात ट्रॅक्टर वाहून गेल्याचा (tractor washed away) प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरा पासून 18 किलोमीटर अंतरावर देवाडा गावातील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. गावातील रहिवासी असलेल्या मल्लेश शेंडे यांच्या शेतात शेतीच्या मशागतीचे काम करण्यासाठी काही शेतमजूर गेले होते. शेतीचे काम संपवून राजू डामिलवार यांच्या मालकीचे ट्रॅक्टरवर बसून आपल्या घरी परत असताना अचानक आलेल्या पावसाने नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला. या जोरदार प्रवाहाने ट्रॅक्टर, कल्टिव्हेटरसह नाल्यात वाहून गेला.
महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; सक्रिय रुग्णसंख्या शून्य
ट्रॅक्टर नाल्यात पडल्याने माधुरी विनोद वगणे (वय 27), मलेश शेंडे (वय 45), आणि लक्ष्मी विनोद वगणे (वय 7) यांचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर मालक राजू डामिलवार, बाधू कुमरे आणि बालवीर कोवे सुखरूप बचावले. गावातील नागरिकांनी शोधमोहीम राबवून माधुरी विनोद वंगणे आणि लक्ष्मी विनोद वंगणे यांचा मृतदेह शोधले तर मलेश शेंडे यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे देवाडा गाव सुन्न झाले असून एकाच घरचे मायलेकी मरण पावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी राजुरा पोलीस पोहचले असून अधिक तपास सुरु आहे.
गडचिरोलीत ट्रक नदीत कोसळून दोघांचा मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी जवळ अहेरी - चंद्रपूर मार्गावरील आष्टी फारेस्ट चेक नाक्यावरुण विडया बनवण्यासाठी असलेला तेंदूपत्ता घेऊन निघालेला एक ट्रक आष्टी येथील वैंनगंगा नदीपुलावरुन थेट वैनगंगा नदीत कोसळला. चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने नदी पुलावरून विरूद्ध दिशेला खाली पाण्यात ट्रक कोसळला. या दुर्घटनेत चालक कमलेश सलविंदरसिंग सलूजा, क्लीनर नितिन दीपक बीके दोघेही जागीच ठार झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.