मुसळधार पावसाचा तडाखा! तब्बल 15 हजार क्विंटल साखल भिजली; कोट्यावधींचे नुकसान

Sugar waste due to heavy rain: मुसळधार पावसामुळे कोट्यावधी रुपयांची साखर भिजल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Sugar waste due to heavy rain: मुसळधार पावसामुळे कोट्यावधी रुपयांची साखर भिजल्याचं वृत्त समोर आलं आहे.

  • Share this:
बीड, 15 जून: राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस (Heavy rain) पडत आहे. मुसळधार पावसामुळे कुठे नदी-नाले ओसंडून भरले आहेत. तर कुठे दुर्घटना झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याच दरम्यान आता बीड (Beed)मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 15 हजार क्विंटल साखर भिजल्याचे (15 thousand quintal sugar waste) वृत्त आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आनंदगाव (सारणी) येथील येडेश्वरी साखर कारखान्याने 6 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले होते. दुपारी जोरदार पावसामुळे येडेश्वरी कारखान्याचा परिसरात पाणीच पाणी झाले. यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या 173208 क्विंटलच्या गोदामात पाणी शिरले. गोदामात पाणी शिरल्यामुळे गोदामातील 30 हजार पोते साखर भिजली. जोरदार पावसामुळे केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या गोदामात पाणी शिरले. यामुळे गोदामातील 30 हजार साखरेचे पोते भिजले.15 हजार क्विंटल साखर भिजल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भिजलेल्या साखरेची अंदाजे किंमत कोट्यावधी रुपये असल्याचं बोललं जात आहे. नाशकात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; शेकडो क्विंटल कांदा भिजला, बळीराजाचे लाखोंचे नुकसान गोदमातील पाणी काढताना 40 ते पन्नास जण प्रयत्न करत होतो. अर्ध्या तासात 132 मिमी पाऊस झाला. पाणी बाहेर निघायला अडचणी आल्या आणि पाणी गोदामात पाणी शिरले अशी माहिती गोदाम व्यवस्थपकांनी दिली आहे. 51 हजार होते खराब होतील असा अंदाज कारखान्याचे कार्यकारी संचालक बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
Published by:Sunil Desale
First published: