विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, मोदींचा नागपूर दौरा रद्द

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, मोदींचा नागपूर दौरा रद्द

विदर्भात गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. इथे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

  • Share this:

हर्षल महाजन

नागपूर, 6 सप्टेंबर : विदर्भात गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. इथे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागपूरमध्येही जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे.

24 तासात 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडणार असेल किंवा 2, 3 दिवस जर जास्त पाऊस झाला तर रेड अलर्ट दिला जातो. त्यामुळेच 4 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला. पावसाचे ढग ओडिशा राज्यावर आले आहेत. ते उद्यापर्यंत छत्तीसगडपर्यंत येईल त्यामुळे विदर्भात जोरदार पाऊस पडू शकतो, असं नागपूर हवामान विभागाने म्हटलं आहे.

गडचिरोलीमध्ये पूर

गडचिरोलीमध्येही मागच्या दोन दिवसांपासून पुराची स्थिती आहे. दक्षिण गडचिरोलीतील भामरागड आणि मूलचेरा या दोन तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला. पर्लकोटा नदीला पूर आल्याने मोठा पूल पाण्याखाली आला. त्यामुळे भामरागड तालुक्याचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला.

भारत आज रात्री चंद्रावर रचणार इतिहास, वाचा 'Chandrayaan 2' चा महत्त्वाचा टप्पा

यंदाच्या पावसाळ्यात भामरागडचा संपर्क तुटण्याची ही पाचवी वेळ आहे. दिना नदीच्या पुलावरून चार फूट पाणी वाहत असल्याने मूलचेरा तालुक्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. अहेरी तालुक्यात जिमलगट्टा परिसरातील २५ गावांचा किष्टापूर नाल्याला पूर आल्याने संपर्क तुटला आहे. चामोर्शी तालुक्यातही याहून वेगळी परिस्थिती नाही.

==============================================================================================

पुणे फेस्टीव्हलमध्ये वैष्णवीची फक्कड लावणी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 09:06 PM IST

ताज्या बातम्या