मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाणे जिल्ह्यात पावसानं हाहाकार! भिवंडीत घरं पाण्याखाली; रस्त्यांना नदीचं स्वरुप; पाहा VIDEO

ठाणे जिल्ह्यात पावसानं हाहाकार! भिवंडीत घरं पाण्याखाली; रस्त्यांना नदीचं स्वरुप; पाहा VIDEO

भिवंडी शहरालगत असलेल्या कामवारी नदीला पूर आला आहे.

भिवंडी शहरालगत असलेल्या कामवारी नदीला पूर आला आहे.

भिवंडी शहरालगत असलेल्या कामवारी नदीला पूर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhiwandi Nizampur, India
  • Published by:  News18 Desk

ठाणे, 16 सप्टेंबर : राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. तर मुंबई आणि उपनगर परिसरातसुद्धा पावसानं धुमशान घातलं आहे. यासोबत ठाण्यातसुद्धा पावसाने थैमान घातले आहे. ठाण्यातील भिवंडी परिसरात मुसळधार पावसामुळे तर रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. तसेच घरंही पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले आहे. यासंबंधीचा व्हिडिओ समोर आले आहे.

भिवंडीतील परिस्थिती कशी?

भिवंडी शहरालगत असलेल्या कामवारी नदीला पूर आला आहे. यामुळे नदीच्या किनारी असलेल्या 10 ते 12 घरांमध्ये पाणी शिरले आहे. याच पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नदीला जोडणाऱ्या खाडीच्या पाण्याची पातली वाढल्याने खाडी किनारी असलेल्या म्हाडा कॉलनी, इदगा, बंदर मोहल्ला सह परिसरातील अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे. या संपूर्ण परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहे.

अजूनही याठिकाणचा पाऊस थांबला नसल्याने परिस्थिती गंभीर होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क होण्याची गरज आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे भिवंडीत भाजीपाला वाहून गेला आहे. यासंबंधीचा ही व्हिडिओ समोर आला आहे.

हेही वाचा - मुसळधार पावसानं मुंबईकरांचे हाल, लोकल ते रस्ते वाहतुकीचाही खोळंबा

या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. भिवंडी तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे पारोळ रोडवरील वारणा नदीला पूर आला आहे. यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. या परिस्थिती शेतकरीसुद्धा चिंताग्रस्त झाला आहे. या जोरदार पावसाचा ठाणेकरांना मोठ्याप्रमाणात फटका बसला आहे.

दरम्यान, सकाळी मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर ही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले आहेत. खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितलं जात आहे. मुंबई- नाशिक महामार्गावरील  पडघा टोलनाका परिसरात देखील  खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

First published:

Tags: Bhiwandi, Rain flood, Rain updates, Thane