मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Rain : रत्नागिरीत मुसळधार, जनजीवन विस्कळीत; इतर ठिकाणची परिस्थिती कशी?

Maharashtra Rain : रत्नागिरीत मुसळधार, जनजीवन विस्कळीत; इतर ठिकाणची परिस्थिती कशी?

उत्तर महाराष्ट्राच्या काही भागावर आणि घाट भागातही मध्यम तीव्रतेचे ढग आहेत.

उत्तर महाराष्ट्राच्या काही भागावर आणि घाट भागातही मध्यम तीव्रतेचे ढग आहेत.

उत्तर महाराष्ट्राच्या काही भागावर आणि घाट भागातही मध्यम तीव्रतेचे ढग आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ratnagiri, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 सप्टेंबर : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आल आहे. तर काही ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता रत्नागिरीतील पावसामुळे जनजीवन विस्कळी झाले आहे. याठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

रत्नागिरीत मुसळधार -

मागच्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाने दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात उघडीप दिली. मुंबईसह उपनगरात पावसाने मागच्या 24 तासांत जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गेल्या दोन तासापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. हवामान विभागाने 17 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या काही भागावर आणि घाट भागातही मध्यम तीव्रतेचे ढग आहेत. त्यामुळे पालघर, नाशिक, पुणे आणि सातारा घाट, अहमदनगर, औरंगाबाद, बीड परिसरात हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर यासोबतच आज राज्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पावसाच्या सरी बरसल्या. मुंबई, ठाणे याठिकाणी अंशता ढगाळ आकाश परिस्थिती होती.

दरम्यान, उत्तर प्रदेशात आज आणि उद्यापासून बिहारमध्ये पुढील 2 दिवस पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये 20 सप्टेंबरपासून सुरू होणारा आणि त्यानंतरच्या 3-4 दिवसांत पाऊस अतिवृष्टीसह अति-मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -  दोन तास, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप, अखेर मध्य रेल्वेची वाहतूक सुरु, पाहा VIDEO

ठाण्यात जोरदार पाऊस 

भिवंडी शहरालगत असलेल्या कामवारी नदीला पूर आला आहे. यामुळे नदीच्या किनारी असलेल्या 10 ते 12 घरांमध्ये पाणी शिरले आहे. याच पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नदीला जोडणाऱ्या खाडीच्या पाण्याची पातली वाढल्याने खाडी किनारी असलेल्या म्हाडा कॉलनी, इदगा, बंदर मोहल्ला सह परिसरातील अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे.

First published:

Tags: IMD FORECAST, Rain updates, Ratnagiri