VIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली

VIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली

रविवारी आणि सोमवारी सकाळी झालेल्या पावसामुळे पुण्याच्या मार्केट यार्डसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

  • Share this:

पुणे, 05 नोव्हेंबर: रविवारी आणि सोमवारी सकाळी झालेल्या पावसामुळे पुण्याच्या मार्केट यार्डसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सगळ्या रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलं आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल म्हणजे रविवारी आणि आज सकाळी पुण्यात जोरदार पाऊस झाला.

महाराष्ट्रात पावसाबाबत हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला होता. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. त्यातप्रमाणे अकोला, पुणे आणि कोकणातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.

मनमाड, मालेगाव, चांदवड, येवला, नांदगाव परिसरात पावसाचे आगमन झालं. विजांचा कडकडाट करीत चांदवड आणि मालेगावला पावसाने अर्धातास झोडपून काढलं. पाऊस सुरू होताच वीज पुरवठाही खंडित झाला होता. यात नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथे अंगावर वीज पडून महादेव सदगीर या इसमाचा मृत्यू झाला आहे.

आज मावळ तालुक्यात विजेच्या कडकटासह पाऊस झाला. मावळ तालुक्यातील नसावे गावात वीज पडून दोघांचा  मृत्यू झाला आहे.

तर धुळे शहरासह जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊसाने हजेरी लावली आहे. आताही जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. जळगाव शहर आणि जिल्ह्यात मध्यरात्री बेमौसमी पावसाने हजेरी लावली. त्याने हवेत गारठा वाढला आहे.

शिर्डी आणि अकोला तालुक्यात जोरदार पावसाने दुकानांध्ये पाणी शिरलं आहे. ऐन दिवाळीच्या गर्दीत दुकानांमध्ये पाणी शिरल्याने बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. काल रात्री 100 मीमीच्या आसपास पाऊस झाला असून अकोले शहरात पावसानं जोरदार बॅटिंग केल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सकाळ पासून जिल्ह्यात उकाडा वाढला असून आजही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच 6 तारखेनंतर गोव्यासह महाराष्ट्रात हवामान कोरडं राहिल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक भागात यंदा दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे आता उशीरा का होईना वरूणराजा राज्यातील बळीराजाला दिलासा देईल का, हे पाहावं लागेल.

VIDEO: 'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...!'

First published: November 5, 2018, 2:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading